Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

लग्नानंतरच्या काही दिवसात या गोष्टींचा उल्लेख नात्यात दुरावा आणू शकतो.

लग्नानंतरच्या काही दिवसात जोडीदाराला समजून घेताना काही गोष्टी मुद्दाम किंवा कळत-नकळत बोलल्या जातात त्यामुळे कदाचित जोडीदार दुखावला जाऊन नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. अश्याच  काही गोष्टी आम्ही सांगणार आहोत ज्याचा उल्लेख लग्नानंतरच्या काही दिवसात केला जाऊ नये

१. जोडीदाराची तुलना इतर व्यक्ती बरोबर करणे.

तुमच्या जोडीदरची तुलना तुमच्या मित्र-मैत्रिणीच्या जोडीदाराबरोबर करू नका. तसेच वडील ,भाऊ किंवा बहीणाचे पती यांच्याशी देखील त्यांची तुलना करू नका यामुळे तुमच्या जोडीदाराला वाईट वाटण्याची शक्यता असते. आपल्या जोडीदाराला समजवून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकामध्ये काही खास गोष्टी असतात. समोरच्या व्यक्तीतील चांगले गुण ओळखा

२. एकमेकांच्या नातेवाईकांना नावं ठेवणे.

प्रत्येक कुटूंबात विविध स्वभाव नातेवाईकां असतात,त्यांचे वागणे-बोलणे कधी-कधी न पटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हांला राग येण्याची शक्यता असते. परंतु आपल्या जोडीदाराला ती व्यक्ती तो -ती नातेवाईक किती प्रिया आहे हे लक्षांत घेऊन अश्या गोष्टींवर बोलणं नावं ठेवणे टाळावे. यामुळे भांडणे आणि रुसवा निर्माण होतो हे तळण्यासाठी काही गोष्टीकडे दुर्लक्ष करावे.

३. जोडीदाराच्या मित्र परिवाराला नावं ठेवणे.

प्रत्येक व्यक्तीला आपला मित्रपरिवार खूप जवळचा असतो. त्यामुळे आपल्या मित्रपरिवाराला नावं ठेवलेलं कोणालाच आवडणार नाही. आपल्या जोडीदाराला देखील त्याचा /तिचा मित्र परिवार प्रिय असतात. प्रत्येक व्यक्तीत जसे दुर्गुण असतात. तसे तिच्या /त्यांचा मित्र/मैत्रिणींमध्ये देखील असतील त्यामुळे या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून आपल्या जोडीदाराला तो मित्र/मैत्रिण किती महत्वाची आहे हे लक्षात घ्यावे.

४. आई-वडिल म्हणाले म्हणून लग्न केले.

प्रत्येक जोडप्यामध्ये मतभेद असतात.त्यामुळे काही कारणांनी जर भांडणे झाली तरी मला तू पसंत नव्हतास आई वडील म्हणाले म्हणून मी लग्न केलं. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणी तरी मिळाले असते, हि गोष्ट बोलल्याने जोडीदार दुखावला जाऊ शकतो.

५. लग्नात आलेल्या आहेराबाबत बोलणे.

 

आपल्या जोडीदाराच्या एखाद्या नातेवाईकाने किंवा आई-वडिलांनी लग्नात दिलेल्या भेटवस्तू वरून किंवा आहेरावरून त्यांचे प्रेम आणि पत्रात ठरवणे आणि ते सतत जोडीदाराला बोलून दाखवणे, यामुळे जोडीदार दुखावला जाण्याची शक्यता जास्त असते.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon