Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

लग्नानंतर स्वतःकडे लक्ष देणे स्वार्थीपणा नाही, त्यामुळे अपराधी वाटण्यासारखे काही नाही


लग्नानंतर आपले आयुष्य आपण एखाद्या सोबत शेअर करणे हा अनुभव अतिशय सुंदर असतो. आयुष्यभर एकमेकांना प्रेम देण्याचे वाचन देता. आयुष्यभर आपल्या मागे कोणी तरी खंबीरपणे उभे आहे त्याच्याशिवाय तुमचे आयुष्य अपूर्ण आहे. पण एक महिला म्हणून स्वतःला थोडेसे प्रोत्साहन द्या. आपण आपला सगळा वेळ आपल्या मुलांना, नवऱ्याला, कामाला आणि न जाणो कशा कशाला देतो पण स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला विसरतो. आपल्याला काय शिकणे गरजेचे आहे का? काही वेळा स्वतःला प्राधान्य दिले पाहिजे आणि आपल्या गरजा व इच्छेबद्दल विचार करणे योग्य आहे. जसे एखादी मोटार चालवायला आपण त्यात इंधन भरतो तसेच आपल्या गरजा निश्चित करणे, स्वतःला प्राधान्य देणेही गरजेचे असते. ज्यामुळे आपण आनंदी राहतो. जर आपण आनंदी असलो तर ते आपल्या सभोवतालच्या लोकांवर प्रतिबिबिंत होते. तुम्ही नि:स्वार्थी राहण्याचे कधी तरी नकारात्मक परिणाम होतात. तुम्ही लग्न केले याचा अर्थ स्वत्व विसरून सतत इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे असे नाही. पुढे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुम्ही स्वतःसाठी पूर्ण वेळ देऊ शकाल.

 जेव्हा आपण आपल्याला स्वत:ला आवडेनासे होतो 

जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा आपल्याला स्वतःकडे बघवत नाही. स्वतःची काळाजी घ्यावी. हा एक संकेत आहे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात याचे. वर्तमानात हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्याची. तुमच्या व्यग्र दिनक्रमामधून स्वतः:साठी काही तरी करायला वेळ काढा. व्यायामशाळेत जा, ब्युटी पार्लरमध्ये जा, मेडीक्युअर-पेडिक्युअर,हेअरकट,स्विमिंगची आवड असेल तर तिकडे जा. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला पूर्वी खूप रस होता त्यामध्ये आताही त्यात स्वारस्य गमावू नका. तुम्ही स्वतःसाठी वेळ देता यात काहीही गैर नाही. या गोष्टीबाबत अपराधीपणाची भावना मनात आणून देऊ नका. काही गोष्टी या स्वतःसाठीच करायच्या असतात.

 जेव्हा आपला दिनक्रम इतरांभोवती फिरतो

 इतरांच्या गरजांची सोय बघून दिनक्रम साफ ठेवा. आम्हाला माहीत हे सर्व हाताळणे अवघड आहे.तुमच्या मुलाला कायम कोणत्या तरी पार्टी किंवा खेळाच्या सरावाला जायचे असते, घरी कोणी पाहुणे येणार म्हणून त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा असतो, मीटिंग्सला जायचे असते, या सगळ्यात तुम्ही अगदी गढून जाता. शांत व्हा एक दीर्घ श्वास घ्या सर्व कामासाठी आपल्या जोडीदाराची मदत घ्या. आपण दोघांनी समन्वय साधून सर्व कामे पूर्ण केली तर व्यग्र दिनक्रमातून सुद्धा तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळेल.आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला जा, त्यांच्यासोबत वेळ घालवा. ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ते करा. स्वत: साठी काही केले नाही तर तुमच्या जोडीदारावर चिडलेले असता आणि आपल्या जीवनाबद्दल असमाधानी असता.

 यापूर्वी तुम्ही कधी कोणाला 'नाही' म्हणाले आहे हे आठवा 

 जर तुम्हाला शेवटचा 'नकार' कधी दिला हे आठवत नसेल तर कायमच सगळ्या बाबतीत'हो' म्हणण्याचा या सवयीचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव होतो. जर हे तुमच्या क्षमते पेक्षा जास्ती होत असेल तर खरच हीच वेळ आली आहे तुम्ही तुमच्या नात्यात नकार द्यायला शिका. यामुळे तुमचे नाते दृढ होण्याऐवजी कमकुवत होत जाते. त्यामुळे जर का एखाद्यावेळी एखादी पार्टी तुमच्याकडे होऊ नये असे तुमच्या मनात असेल किंवा तुमच्या जोडीदाराच्या मताशी तुम्ही सहमत नसला तर तुमचे मत त्याला ठणकावून सांगा. एक आनंदी आणि विश्वासपूर्ण नाते घडवण्यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon