Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

कुटुंबाला वेळ द्यायला हवा की नाही ?

आपल्या चेहऱ्यावर पावडर लावून ती खराब न होता बाहेर पडू शकताय. जगात वेळ मिळणे हेच एक अवघड काम होऊन बसले आहे. अगदी घरातल्यांसमवेत एकत्र वेळ घालवूया असे म्हटले तरीही आपले व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी दिलेला वेळ विस्कटतो. आपण खूप व्यग्र असतानाही कुटुंबाबरोबर भरपूर वेळ घालवू शकू यासाठी आपल्या वेळापत्रकाचे नियोजन खूप कल्पकतेने करण्याची गरज आहे. आपल्या कामाचा खोळंबा न करता, अधिक वेळ न काढता थोड्या हुशारीने कल्पना लढवून कुटुंबाला एकत्र आणून वेळ घालवू शकता.

 १. रात्रीचे जेवण एकत्र घ्या. 

 कौटुंबिक वेळ घालवण्यासाठी रात्रीचे जेवण ही उत्तम वेळ आहे. दिवसातील ही एक वेळ अशी आहे ज्या वेळी सर्वच जण जेवणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. जेवता जेवता चर्चा होतात, एकमेकांच्या मतांची, दृष्टीकोनांची देवाणघेवाण होते आणि मुलांच्या खोडकर गोष्टीमुळे हास्यविनोद घडून होणारा संवाद संस्मरणीय ठरतो. जेवण एकत्र केल्याने दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत होते आणि या सगळ्या आठवणी मनात साठवल्या जातात. मग करूया ना रात्रीचे जेवण एकत्र आणि कुटुंबाचा एकत्र जल्लोष करूया.

२. स्वप्नरंजन करणाऱ्या गोष्टी

झोपताना गोष्टी सांगितल्यास मुलांशी अधिक जवळीक साधता येईल. मुलांसमवेत अंथरुणात पडून त्यांना एक गोष्ट वाचून दाखविल्यास त्यांच्या मनात आयुष्यभर त्या आठवणी कायम राहतील. पुस्तकातील गोष्टीत चांगले वाईट मुलांना कळल्यानंतर त्यांचे आनंदी होणे किंवा वाईट वाटणे हे पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू झळकेल. झोपताना गोष्टी वाचल्या की मुले आपल्या अधिक जवळ येतात, भावनिकरित्या मुलांशी असलेले नाते अधिक दृढ होते आणि ते आपल्या शब्दांतून जग पाहू लागतात. त्यामुळे मुलांबरोबर एकत्र लोळा, मस्ती करा आणि एकत्र गोष्टी वाचा.

३. प्रत्येकाला सामील करून घ्या

अनेक हातांची जोड मिळाली तर कोणतेही काम लवकर होते, असे म्हणतात. मग रोजच्या कामातही हेच सूत्र का नाही अवलंबायचे?प्रत्येक सदस्याला घरतील काही कामे दिली जाऊ शकतात जसे रात्रीच्या जेवणाची तयारी करणे किंवा घर साफ करणे,किराणा सामान खरेदी सारखी कामे वाटून घेतली जाऊ शकतात जेणेकरून आपल्या वरचा कामाचा भर हलका होईल आणि एकत्र काम करण्याने मजाही येईल. लहानग्यांना सामील करून घेताना त्यांना फळे, भाज्या धुणे आणि उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवणे अशी कामे सांगता येतील. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार, रविवार स्वयंपाकात नवऱ्याची मदत घेऊ शकता त्यामुळे निकोप नातेसंबध तयार होण्यास मदत होईल शिवाय जेवण तयार करण्यात खूप वेळ खर्च होणार नाही. काम सोपे करण्यात कुटुंबाची भूमिका खुओ महत्वाची असते त्यामुळे तुम्हाला खूप चांगला वेळ एकत्र घालवता येऊ शकतो.

४. नियोजन

आठवड्याचे आधीच  नियोजन करणे हा वेळ वाचविण्यासाठीचा सर्वात योग्य मार्ग आहे. स्वयंपाकघरात एक छोटी दिनदर्शिका ठेवा आणि त्यावर ज्या गोष्टी करायच्या त्याच्या नोंदी कराव्या. यासाठी यादीमुळे अतिरिक्त कामाचे नियोजन करून व्यग्र दिवसाचे रुपांतर कमी व्यग्र दिवसात रुपांतर होण्यास मदत होईल. त्यामुळे वाचलेला वेळ कुटुंबासाठी देऊ शकता. थोडे योग्य नियोजन केल्यास कुटुंबाला अधिक वेळ देणे शक्य होईल.

५. रात्रीची शतपावली 

कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी अजून एक सुंदर मार्ग म्हणजे सूर्यास्तानंतर थोडावेळ फिरायला किंवा चालायला जावे किंवा जेवण झाल्यानंतरची शतपावली करणे. संध्याकाळचे चालण्याने शांततेचा अनुभव देतोच त्यामुळे कुटुंबातील सहबंध मजबूत होण्यासाठी उत्तम गोष्ट आहे, आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाचे संभाषण सुरु होण्यास सुरुवात होईल. यामुळे घरातील पाळीव प्राण्यांनाही फिरायला मिळेल, मुलांना सायकल चालवायचा सराव होईल आणि तुम्ही आणि तुमचे पती एकमेकांचा हात धरून मोकळ्या हवेत फिरून ताजी हवा भरून घेऊ शकतो. थोडक्यात मोकळ्या हवेत गेल्याने सगळ्यांना खूप काही फायदे होणार आहेत.

वरील काही जादुई उपायांनी आनंदी घराचा पाया उभारू शकतो. एकूणच अधिक सर्जनशील होत आपल्या कुटुंबासाठी अधिक वेळ काढता येईल आणि कुटुंबासाठी आणि इतर काही कामासाठी वेळ काढू शकतो. कुटुंबासाठी वेळ काढणे ही निवड नाही तर ती प्राधान्याचा मुद्दा आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon