Link copied!
Sign in / Sign up
71
Shares

कोरफडीचे आरोग्यविषयक फायदे

कोरफडीमध्ये अँलोइन (२० ते २२%), बार्बॉलाइन (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाइम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे.ही कोरफड आरोग्यासाठी उत्तम असते. या कोरफडीचे आरोग्यविषयक अनेक ते कोणते ते आपण जाणून घेऊया.

      यकृताच्या आरोग्यासाठी

यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते.

मासिकपाळीविषयक समस्या

स्त्रियांनी मासिकपाळीच्या दरम्यान किंवा दररोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने अनियमित मासिक पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यास योग्य प्रमाणात रक्तस्त्राव होतो. जर मासिकपाळी दरम्यान रक्तस्त्राव दरम्यान रक्ताचे क्लॉट पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.

वजन कमी करण्यास मदत होते 

कोरफडीच्या रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळे मेटॅबॉलिक रेट वाढून वजन घटते. या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

शरीर डिटॉक्स करते

कोरफडीचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो.रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस उपयुक्त ठरतो.

खोकल्यावरती गुणकारी

सर्दी आणि खोकल्यामध्ये वर घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो. कोरफडीचा भाजून त्याचा गर खाल्यास खोकल्याच्या बाबतीत आराम पडतो

पचनक्षमता वाढवते

कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते, त्यामुळे आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या गराचे किंवा रसाचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते 

 कोरफडीच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या रसामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘के’, अमिनो ॲसिड आणि फायटोन्यूट्रिन्स यांसारखे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे इंन्फेक्शनपासूनही बचाव होत

सौंदर्य विषयक उपयुक्तता 

गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते.कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.कोरफडीचा शरीरारतील उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसांना चमक येते.

अश्या या गुणकारी कोरफडीचे आरोग्यविषयक खुप फायदे असले तरी त्याचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि जर कोरफडची ऍलर्जी असल्यास त्याचे सेवन टाळा. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon