Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

त्वचेचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी . .


मुंबईमधल्या खूप स्त्रियांनी त्यांच्या त्वचेवर पडणाऱ्या परिणामाबद्धल विचारले आहे की, इथल्या प्रदूषणाने आणि खूप थकव्यामुळे त्वचा ही निस्तेज व्हायला लागते. तर त्यावर काहीतरी घरगुती उपाय आहे का? असे विचारले आहे. आणि त्यांना घरगुती उपाय हवा आहे. क्रीम आणि केमिकलयुक्त कॉस्मेटिक नको. तेव्हा ह्यासाठी तुम्हाला खूप सोपा आणि घरात उपलब्ध असणारा उपाय सांगतो.

त्वचेचं सौंदर्य आणि आरोग्य हे दोन्ही चांगले ठेवायचे असेल तर कोरफड आणि हळद हे अतिशय उपयुक्त पदार्थ आहेत.

       १) वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. या सुरकुत्या दिसू नयेत यासाठी ठराविक वयोगटातील महिला आणि पुरुष अनेक प्रयत्न करतात. मात्र त्याचा म्हणावा तितका फायदा होतो असे नाही. कोरफड आणि हळदीच्या वापरामुळे मात्र या सुरकुत्या कमी दिसण्यास मदत होते.

२) १ टीस्पून नारळाचं तेल, १ टीस्पून कोरफडीचा गर आणि १ टीस्पून हळद या एकत्र करुन हा लेप चेहऱ्याला लावा. दोन मिनिटं हा लेप ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

३)खरुज आणि नायटा यांसारख्या त्वचारोगांवर उपचार म्हणूनही कोरफड आणि हळदीचा वापर होतो. ज्या ठिकाणी नायटा किंवा खरुजाची लागण झाली आहे तिथे हळद आणि कोरफडीचा लेप लावल्यास तो भाग लवकर बरा होतो. हळद आणि कोरफड यांच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे हे शक्य होतं. हा लेप तयार करण्यासाठी चमचाभर नारळाचं तेल, कोरफडीचा गर आणि हळद घेऊन ही पेस्ट त्वचेवर साधारण अर्ध्या तासासाठी लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

४) त्वचेच्या रंध्रांमध्ये प्रदूषणामुळे जिवजंतू शिरकाव करतात. त्यांचा नायनाट करुन त्वचेचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठीसुद्धा कोरफड आणि हळदीचा सर्रास केला जातो. यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरुमं कमी होतात. चेहऱ्यावर लावण्यात येणारा हा लेप तयार करण्यासाठी एक चमचा हळद आणि कोरफडीचा गर आणि एक चमचा मध यांचं एकत्र मिश्रण करुन हे मिश्रण मुरुमं असणाऱ्या भागांवर साधारण पंधरा मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. काहीवेळा असे केल्यास मुरुमं कमी होण्यास मदत होते.

५) अनेकांची त्वचा कोरडी असते. अशांना हिवाळ्यात त्वचेची आग होण्याचा त्रास होते. पण त्वचेमध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी कोरफड आणि हळद हे रामबाण उपाय ठरतात. ज्यासाठी १ टीस्पून हळद आणि कोरफडीचा गर आणि काकडीचा रस हे सर्व पदार्थ एकत्र करुन ही पेस्ट पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon