Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

जाणून घ्या कोणती सौंदर्यप्रसाधने (मेकअपचे साहित्य) साहित्य किती दिवस वापरावे

प्रत्येक मेकअपचे साहित्य किती दिवस वापरायचे याची देखील एक मुदत असते. पण अनेक जण याचा विकचर न करता मुदत संपली तरी मेकअपचे साहित्य वापरात असतात यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. साधारणतः कोणते सौंदर्य प्रसाधन किती दिवस वापरायचे हे आपण पाहणार आहोत.

१. फेस पावडर

रोजच्या वापरातील फेस पावडर दोन वर्षांपर्यंत वापरण्यास काही हरकत नाही

२. लिपस्टिक

एक लिपस्टिक एका वर्षापेक्षा अधिक ओठाकरता हानिकारक असते. काही लिपस्टिकची मुदत दोन वर्ष असते पण साधारणता एक वर्षपेक्षा जास्त दिवस एक लिपस्टिक वापरू नये. एक्पायर लिपस्टिक वापरल्याने ओठ काळे पडू लागतात.

३. लिप ग्लॉस

ओठांना चमकदार करण्यासाठी वापरण्यात येणारे लिप ग्लॉस साधरणतः दीड वर्षानंतर वापरू नये.

४. आय लाइनर

जेल किंवा लिक्विड आय लाइनर दोन ते तीन महिन्यानंतर बदलावे.परंतु पेन्सिल लायनर लाइनरने दोन वर्ष टिकते. तरी त्यावरील एक्सपायरी डेट नुसार ते बदला

५. फाउंडेशन

 

 

क्रीम कॉम्पॅक्ट फाउंडेशन 18 महिन्यात बदलायला हवे तसेच हल्ली सगळ्यात प्रसिद्ध असणारे ऑईल फ्री फाउंडेशन वर्षभर वापरू शकता.

६. कंसीलर

कंसीलर मुळे चेहऱ्यावरचे डाग लपवता येतात. हे कंसीलर साधारणतः एक ते दीड वर्षे चालते परंतु जर काही ऍलर्जी जाणवल्यास त्याचा वापर करणे थांबवावे.

७. आय शॅडो

क्रीम आय शॅडो एक वर्ष वापरला तरी चालू शकतो परंतु पावडर आय शॅडो साधरणतः दोन वर्षे चालते.

८. मस्करा

मस्करा दोन ते तीन महिन्यात खराब होते

टीप - वरील सौंदर्यप्रसाधांचा वापरण्याचा एक कालावधी दिला आहे. परंतु प्रत्येक प्रॉडक्टची एक्सापायरी डेट बघून ते वापराणे थांबवावे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon