Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

कोमट पाणी प्यायल्याने होणारे आरोग्यविषयक हे फायदे तुम्हांला आहेत का?

        शरीराच्या तापमानाप्रमाणे पाणी पिणे हे योग्य प्रकारे पाणी पिण्याची पद्धत आहे. म्हणजेच एक वेळ तुम्ही थोडं जास्त गरम पाणी प्यायले तर हरकत नाही पण थंड पाणी पिऊ नये. त्यातला मध्य म्हणजे कोमट पाणी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यविषयक अनेक फायदे होतात.

१.  त्वचे संबंधीत समस्या दूर

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी पाणी पिताना ते कोमट पाणी पिणे सुरु करा गरम देखील चालेल. यामुळे तुमच्या त्वचेसंदर्भातील अनेक समस्या दूर होतील आणि आणि त्वचा नितळ होईल .

२. मासिकपाळी दरम्यानच्या समस्या

मासिकपाळी दरम्यान कोमट पाणी प्यायल्याने या काळात  होणाऱ्या वेदना कमी होतात. 

३. किडनीबाबतच्या समस्या दूर होतात 

कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवी बाहेर पडते आणि किडनीवर कमी दबाव पडतो आणि किडनी निरोगी राहते. 

४. भूक वाढते आणि पोटाच्या समस्या दूर होतात

दिवसातुन दोन वेळा कोमट पाणी प्यायल्याने तुम्ही पोटाच्या समस्यांपासुन दूर राहू शकता. सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातुन सर्व विषारी तत्त्व लघवी वाटे बाहेर जातात. 

५. संधीवात

संधीवात असणा-या लोकांनी गरम पाणी पिणे एखाद्या औषधी प्रमाणे आहे. नियमित गरम पाणी प्यायल्याने हाडांच्या समस्या कमी होतात 

६. वजन कमी करते

वजन कमी करण्यात देखील गरम पाणी मदत करते. जेवणाच्या एक तासानंतर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते. जर कोमट पाण्यात लिंबू आणि मधाचे काही थेंब मिळवून प्यायले तर वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. 

७. इम्यूनिटी वाढते

एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू मिळवून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते. गरम पाणी लिंबूचे कॉम्बिनेशन शरीराच्या इम्यूनिटीला मजबूत करते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon