Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

बनवून बघा एकदा कोळंबीचे सॅलड

लागणारे साहित्य :

* २५० ग्रॅम कोळंबी साफ केलेली, १ आईस बर्ग लेटय़ूज, १०० ग्रॅम मिक्स सॅलड ग्रीन्स, १ टेबलस्पून हिरव्या लसणीची पात, काश्मिरी मिरची पूड

* मसाल्यासाठी २ मध्यम आकाराचे टोमॅटो, ५ टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, ६० मिली लाइट क्रीम, १ टेबलस्पून व्हिनेगर, १ टीस्पून कसुरी मेथी, चिमूटभर साखर, १ टीस्पून वोरसेस्टरशिर सॉस, मीठ, मिरपूड व बडीशेप पावडर चवीनुसार, १ काकडी 

कसे तयार करायचे : 

# अगोदर टोमॅटो गरम पाण्यातून उकडून घ्यावेत. टोमॅटोची साले व बिया काढून टाकाव्या. ते बारीक चिरून घ्यावेत. एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑइल, क्रीम, कसुरी मेथी, साखर, वोरसेस्टरशीर सॉस, मीठ, मिरपूड व बडीशेप पावडर एकत्र फेसून घ्यावे. त्यात टोमॅटो व बारीक चिरलेली काकडी घालावी. आता हे सारे एकत्र करावे. हा मसाला झाला तयार.

# कोळंबी नीट साफ करून वाफवून घ्यावी. एका बाऊलमध्ये ही वाफवलेली कोळंबी, चिरलेले आइस बर्ग लेटयूज व अर्धे ड्रेसिंग(मसाला)  एकत्र करून घ्यावे.

# बाऊलमध्ये आधी मिक्स सॅलड ग्रीन्स पसरवावे. त्यावर कोळंबीचे हे तयार मिश्रण घालावे. त्यावर उरलेले ड्रेसिंग घालावे. बारीक चिरलेली हिरवी लसूण पात व लाल मिरची पावडर वरून भुरभुरावी आणि सॅलड सव्‍‌र्ह करावे.

तुम्ही किती कॅलरी मिळवाल : २२३

* यामध्ये असलेले प्रोटिन : १३ ग्रॅम

* ह्यात असलेले फॅट : १८ ग्रॅम

* ह्यात असलेले फायबर : २ ग्रॅम

* आणि कार्ब्स : ३ ग्रॅम

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon