Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

कॉफी अति पिऊ नका !कारण ह्यामुळे. . . ?

भारतातल्या किती स्त्रिया कॉफी पीत असतात. हा अगोदर प्रश्न आहेच ? कारण चहा आणि कॉफी पिणे बऱ्याच स्त्रियांना आवडत नसते. पण ज्या स्त्रिया कॉफी पीत असतील त्यांच्यासाठी हा ब्लॉग. आणि जर तुमचे कॉफी वर खूपच प्रेम असेल तर ह्या लेखामधल्या किती गोष्ट मनावर घ्यायच्या हे तुमच्यावर आहे.  

अगोदर कॅफिन विषयी घेऊ

जगभरात कॅफिनचा वापर केला जातो. कॅफिनमुळे आपल्या मेंदूला ताजेतवाने वाटते त्यामुळे कामाची क्षमता वाढते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. कॅफिन आपल्या शरीराच्या श्‍वासोच्छ्वासात आराम देते. पण कॅफिन हे उत्तेजना आणणारे पेय असल्याने ताजेतवाने वाटत असते. 

कॉफी पिण्याचे फायदे आहेत तेही जाणून घ्या 

कॅफिनचा मर्यादित स्वरूपात वापर केल्यास शरीराच्या कार्यप्रणालीवर वाईट परिणाम होत नाही. वयस्कर व्यक्‍ती दिवसातून तीन कप कॉफी म्हणजे जवळपास 600 मिलीलीटर कॉफीचे सेवन करावे. इतक्या प्रमाणातील कॉफीचा आपल्या शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाही. पण काही व्यक्तींना खूप कॉफी प्यावी असे वाटते आणि ते पितात आणि त्यामुळे त्यांना रात्री झोप न लागणे किंवा ऍसिडिटी चा त्रास व्हायला लागतो. 

कॉफीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होत असतो 

कॅफिनचा झोपेवर वाईट परिणाम होतो. गर्भवती महिलांना आणि ज्यांना लहान बाळ आहे त्या महिलांनीही कॉफीचे सेवन अधिक प्रमाणात करू नये. दिवसभरात केवळ 200 मिलिग्राम पेक्षा अधिक कॉफीचे सेवन करू नये. गर्भवती महिलांनी जास्त कॅफिनचे सेवन केल्यास त्याचा परिणाम गर्भातील बाळाच्या विकासावर प्रभाव टाकणारा ठरवू शकतो.

किती प्यावी कॉफी

कॅफिन किती प्रमाणात सेवन केले पाहिजे हे समजून घेताना केवळ कॉफीच नाही तर चहाच्या सवयीवरही लगाम लावला पाहिजे. ब्लॅक टी मध्ये प्रति कप 47 ते 60 मिलिग्रॅम कॅफिन असते. ग्रीन टी मध्ये 25 मिग्रॅ, इतर एनर्जी ड्रिंक्स मध्ये 80-100 मिग्रॅ आणि सोड्याच्या एका कॅनमध्ये 40 -50 मिग्रॅ कॅफिन होते.

कॉफीचे तोटे 

जास्त कॉफी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होते. त्यासाठी एक कप कॉफी प्यायल्यानंतर काही वेळानंतर दोन कप पाणी प्यायला हवे. प्रतिदिन आठ ते दहा ग्लास पाणी प्रत्येक व्यक्‍तीने प्यायला हवे.

कॉफीमुळे ऊर्जा मिळत नाही, पण व्यक्‍ती सजग होते. अर्थात अशी ऊर्जा मिळवणे हा कायमस्वरूपी मार्ग निश्‍चितच नाही. अशी ऊर्जा किंवा उत्साह मिळवण्यापेक्षा रक्‍तातील साखरेची पातळी योग्य राखण्यासाठी दर दोन तासांने आरोग्यकारी पदार्थांचे सेवन करावे. दिवसभरात एक कप कॉफी देखील पुरशी ठरू शकते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon