मस्त पाऊस पडत आहे.. चहा बरोबर मस्त भजी खाण्याचा बेत असेल तर तुम्हांला मस्त कोबीची भजी कशी करायची हे सांगणार आहे.

साहित्य
कप बारीक चिरलेली कोबी, ४ चमचे डाळीचे पीठ (बेसन),१ चमचा कॉर्न फ्लोअर, २ हिरव्या मिरच्या,
१ चमचा जिरे, १/२ चमचा हिंग, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून, चवीपुरते मिठ, तेल
कृती
१. कोबी छान चिरून घ्या. चिरलेल्या कोबीला थोडे मिठ लावून घ्या. थोड्या वेळाने कोबीला थोडे पाणी सुटेल. त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
२. मिठ लावलेल्या जिरे, हिंग, लाल तिखट, हळद व्यवस्थित घालून मिक्स करावे. नंतर त्यात ४ चमचे डाळीचे पीठ आणि कॉर्न फ्लोअर घालून पीठ थोडेसे घट्टसर भिजवावे.
३.त्यानंतर तेल गरम करून घ्या आणि नंतर पिठाचे छान गोळे करून तेलात सोडा आणि भजी मध्यम आचेवर तळून घ्या.
प्रिव्हयु इमेज- युट्युब
