Link copied!
Sign in / Sign up
189
Shares

किडनीस्टोन(मुतखडा) म्हणजे काय ? आणि त्यावरील घरगुती जालीम उपाय

 किडनी स्टोन म्हणजे मूतखडा याला युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे म्हणतात. मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होणाऱ्या स्फटिकांना मूतखडा किंवा किडनी-स्टोन म्हणतात. या किडनी-स्टोन मुळे मूत्रमार्गात अडथळा येण्याची शक्यता येते. किडनी स्टोनची लक्षणे कोणती आणि त्यावरील घरगुती उपाय कोणते ते आपण पाहणार आहोत. या उपायांनी तुम्हांला किडनी स्टोनच्या समस्येत नक्कीच आराम पडेल परंतु या समस्येत डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक असते. 

लक्षणे

किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे. प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीमध्ये रक्त तसेच चिकट द्रव पडणे.

घरगुती उपाय 

 १. ओवा

ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. कारण, ओव्यामुळे लघवीला चालना मिळते. त्यामुळे आहारात ओव्याचा समावेश करावा किंवा जेवणानंतर चिमूटभर ओवा खवा 

 २. तुळस

तुळस ही या समस्यांत अत्यंत गुणकारी वनस्पती असून तुळस घालून नियमित चहा घेतल्यास या समस्येत अराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. परंतु तुळशीचा रस तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्ट्रांच्या सल्ल्याने घ्यावा . 

३. कांदा

सकाळी अनशापोटी ६० ते ७० ग्राम रसाच्या नियमित सेवनाने स्टोनचे बारीक बारीक खडे होतात आणि ते लघवीवाटे बाहेर पडतात

४. केळे 

केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा घालते. 

५. डाळिंबाचा रस

किडनी स्टोनपासून सुटका होण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा रस सेवन करणं हा अतिशय गुणकारी घरगुती उपचार आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon