Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

जास्त वेळ लघवी अडवून ठेवताय ? हे वाचा


केळी जास्त दिवस ताजी ठेवायची असल्यास केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवावा.

ऍसिडीटीसाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे निवळी. सकाळी एक चमचा निवळी प्यायची. चुन्याची टयूब आणून रात्री तांब्याभर पाण्यात पिळायची व ढवळून झाकून ठेवून द्यायची. सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे. हीच ती निवळी.

कोणतेही थेपले किंवा पराठे करतांना त्यात उकडलेला बटाटा किसून घालावा पराठे खुसखुशीत होतात.

पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळतांना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.

वाटणात मिरची घातली तर बाकीचे स्वाद लपतात. त्यापेक्षा आयत्यावेळी लाल तिखट घातले तर छान चव येते. शिवाय आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करता येते.

प्लॉवर शिजवतांना त्यात दूध व किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे प्लॉवर पांढरा शुभ्र व तजेलदार रहातो.

इडल्या हलक्या आणि चांगल्या होण्यासाठी पिठात मूठभर कुरमुरे घालून वाटायचे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon