Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

तंग ब्रा घालू नये ? कारण हा त्रास होतो !

स्तन खाली जाण्यापर्यँत ते गळ्यात सूज येण्यापर्यंत - तुम्हाला माहिती आहे का ? की, खूप तंग घातलेला ब्रा तुमच्या प्रकृतीला किती नुकसान देत असतो. आणि ह्याचे कारण असे की, बऱ्याच स्त्रिया चुकीची साईज, किंवा खूप टाईट ब्रा घालत असतात. ह्याचे कारण बरीच असतील जसे, की शरम, आळस, दुर्लक्षितपणा, माहिती नसणे पण ह्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटतं असते. ते कशाप्रकारे ह्या ब्लॉगमधून आपण बघणार आहोत.

        १) स्तनांचे खाली जाणे, आणि त्यांची झीज

जर तुमचा ब्रा खूप तंग असेल तर तो तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवत असतो. खूप तंग ब्रा असल्याने जी स्नायू व नस त्वचेला रक्त पोहोचवण्याचे कार्य करत असतात त्यांच्यावर दबाव पडून त्याचा प्रवाह कमी होऊन जातो. आणि ह्यामुळे तुम्हाला कधी- कधी अस्वस्थ वाटायला लागते. आणि ब्रा असलेला हुक जर व्यवस्थित नसेल तर त्याच्याने त्वचेला जखम सुद्धा होऊ शकते.

२) डोकेदुखी

चुकीचा ब्रा हा तुमच्या स्तनांना आणि क्लीवेजला व्यवस्थित सपोर्ट देत नाही त्यामुळे तुमच्या मानेला आणि त्यातल्या स्नायूंवर दबाव पडून ती दुखायला लागतात. कारण ह्या स्नायूंना तुमच्या स्तनांना संभाळण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. आणि जसेही तुमच्या गळ्यातले स्नायू अधिक दबाव सहन करतात त्यामुळे त्याचा परिणाम डोक्यातल्या स्नायूंवर पडून डोकं दुखायला लागते.

३) पाठदुखी

काही स्त्रिया खूप तंग ब्रा घालतात त्यामुळे काय होते तर पाठीच्या वरच्या भागाला रक्ताचे वहन कमी होऊन जाते. त्यामुळे स्पाईन वर दबाव पडतो. आणि ही तुमच्या चालण्या आणि खाली झुकण्यासाठी खूप महत्वाची असते. आणि ब्रा ची स्ट्रॅप सुद्धा फिट असल्याने पाठ दुखायला लागते.

४) कधी - कधी श्वास घ्यायला त्रास

खूप तंग ब्रा घातल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असतो. खोल श्वास घेतला जात नाही त्यामुळे रक्ताला कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळते. आणि ह्यासाठी श्वास खोल असायला हवा. आणि अगोदरच आपल्याला प्रत्येक गोष्टीत घाई असल्याने खोल श्वास घेणे कठीणच होऊन जाते. ह्या सर्व गोष्टी खूप तंग ब्रा घातल्याने होत असतात यापैकी काही त्रास तुम्हाला होतच असेल. आणि काही वेळा ब्रा कमी प्रतीचा असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर पडत असतो. त्यामुळे खूप तंग ब्रा घालू नका.  

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon