Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

ह्या दोघांनी लग्न केले हॉस्पिटलमध्ये आणि तिची शपथ ठरली अखेरचे शब्द. . . . . .


           प्रेम ह्या अडीच अक्षरांमध्ये जगातील सर्व शक्ती सामावली आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यानंतर पुढे वाटचार करणे खरोखर कठीण असते. त्यांना कोणतीच इजा होऊ नये असे वाटत असले आणि त्यांना अगदी हृदयाच्या जवळ घट्ट धरून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही मृत्यूला मात्र आपण प्रियजनांना घेऊन जाण्यापासून थांबवू शकत नाही. काही वेळा आपण प्रेम करीत असलेल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीच फक्त आपल्यापाशी राहातात.

एका प्रेमी युगुलाची ही हृदय पिळवटून टाकणारी कथा ज्यांनी एकमेकांशी लग्न केले आणि मृत्यूने त्यांना एकमेकांपासून वेगळे केले.

२२ डिसेंबर २०१७ रोजी आयुष्यातील शेवटचा श्वास घेण्यापुर्वी अगदी काही मिनिटे आधी तिने तिच्या लग्नाची शपथ घेतली आणि आपल्या प्रियकराशी विवाहबद्ध झाली. तिची कथा अनेकांच्या हृदयाला हात घालणारी असल्याने इंटरनेटवर तिची छायाचित्रे आता व्हायरल झाली आहेत.

कनेक्टिकट मधील सेंट फ्रान्सिस रुग्णालयात हीथर मोशेर आपला प्रियकर डेव्हिड मोशेर शी विवाहबद्ध झाली. तिचे शेवटचे शब्द होते ते तिने घेतलेली विवाहाची शपथ. कोणालाही वाटले नव्हते की इतका दूरचा टप्पा गाठू शकेल. अगदी दीर्घ मॅरेथॉन पूर्ण करून अक्षरशः अंतिम रेष पार केल्याची भावनाच यावेळी सर्वांच्या मनात होती.

२०१५ ही जोडी भेटली तेव्हापासून ते अविभाज्य होते. मात्र त्यांच्या आनंदी आयुष्यावर २३ डिसेंबर २०१६ साली विरजण पडले जेव्हा हीथरला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. स्तनाच्या कर्करोगांचे प्रकार पूर्णपणे बरे होणारे असतात, दुर्दैवाने हीथरच्या बाबतीत नशीब तिच्या बाजूने नव्हते. तिच्या कर्करोरागाची शेवटची पायरी असल्याचे तिला सांगितले आणि या जोडप्याचे जग हादरून गेले. 

ती लवकरच या जगातून जाणार हे माहित असूनही डेव्हिडने तिला त्याच दिवशी लग्नाची मागणी घातली. ‘मी तिला लग्नाची मागणी घालेन याविषयी तिला कल्पनाच नव्हती पण मी स्वतःलाच सांगितले की या बिकट वाटेवर ती एकटी नाही हे तिला समजणे गरजेचे आहे.‘ असे डेव्हिड सांगतो.

मात्र दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती आणि आता मिळालेली वार्ताही पहिल्या बातमीपेक्षा १० पटीने वाईट होती. तिला ट्रीपल निगेटीव्ह स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते जो सर्वात वाईट आणि भयानक प्रकारातील स्तनाचा कर्करोग आहे.

त्यांनी ३० डिसेंबरला लग्न करायचे ठरवले मात्र तिच्या दिवसेंदिवस ढासळणारी प्रकृती लक्षात घेता त्यांनी हा समारंभ २२ डिसेंबरला म्हणजे आधीच करायचा ठरवला.

डेव्हिड म्हणाला, ‘ती माझे प्रेम आहे आणि मी तिला हरवणार होतो, पण मी तिला कायमस्वरुपी हरवून बसणार नाही. हीथर म्हणायची, ‘मला सतत लढायचे आहे हाच मंत्र मी अवलंबणार आहे. ती शेवटपर्यंत लढत राहिली, माझ्या शेवटापर्यंत मी दोन लढाया लढत राहीन.‘

डेव्हिडला त्याच्या प्रदेशात असेच अनाम प्रेम पुन्हा मिळावे अशी प्रार्थना करूया आणि त्याच्या मोठ्या दुःखातून त्याला सावरण्याचे बळ मिळावे अशी आशा करुया.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon