Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

खजुराच्या सेवनाने आरोग्यविषयक हे आश्चर्यकारक फायदे होतात

खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. खजुर हा ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह यांचा स्रोत आहे. खजुराचा उपयोग  मेंदू, हृदय, कंबर, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. तसेच पचायला हलका असतो. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. अश्या या बहुगणी खजुराचे आरोग्यविषयक कसे फायदे होतात ते आपण पाहणार आहोत. 

१. दीर्घायुष्य आणि तारुण्यसाठी उपयुक्त 

खजुराचे सेवन दीर्घायुषी होण्यास आणि तारुण्य टिकविण्यास मदत करतो. निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा आहे त्यांनी खजूर नियमितपणे खावा. (मधुमेही व्यक्तीने खजुराच्या सेवनाच्या प्रमाणबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा) खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुराच्या सेवनाने त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, खजूर खल्ल्याने त्वचा चांगली राहते. कोणत्याही त्वचाची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते

२. वृद्ध आणि अशक्त बालकासाठी आरोग्यदायी 

तापातून उठलेल्यांकरिता खजुराचे सरबत फार चांगले गुण देते. तसेच वृद्ध व लहान कृश बालकांकरिता दोन खजूर, चिमूटभर जिरे व चवीला गूळ किंवा साखर असे मिश्रणाचे सरबत मिक्सरमध्ये करावे. चहा, कॉफी उत्तम पेय म्हणून काम देते.अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.काळा किंवा लालबुंद खजूरच खावा.

३. हाडांच्या आरोग्य सुधारणा 

खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर उपयुक्‍त असते.

४. पांथरीच्या समस्येवर आधारित 

खजुराच्या चार बियांचा गर कुस्करून पाण्याबरोबर नियमितपणे महिनाभर खावा. पांथरी कमी होते. खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.

५. शरिरातील रक्ताच्या कमतरतेवर उपयुक्त

शरीरातील रक्ताची कमतरता खजुराच्या सेवनाने दूर होते.

६. मज्जासंस्था मजबूत :

खजूर आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करतात. जीवनसत्त्वांमुळे मानवी मज्जासंस्थाचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते.

७. निरोगी गर्भधारणासाठी :

खजूर तसेच खारीकमध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे त्याचा लाभ गर्भाला होतो. गर्भाशयातील अर्भकाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर रक्तस्त्रावाला प्रतिबंध होण्यास मदत होते. गरोदरपणी खजूर खल्ल्यास आईला चांगले दूध सुटते. त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण मिळण्यास मदत होते. ( याबाबत देखील गरोदर स्त्रीच्या शरीरास आवश्यक असणारे प्रमाण डॉक्टरांकडून जाणून घेऊन खजुराचे सेवन केल्यास उत्तम ठरते) 

खजूर सेवन करताना त्याचे वरील फायदे मिळावे असे वाटत असल्यास खजुराची निवास करताना तो उत्तम दर्जाचा असावा. तसेच त्याचे सेवन करण्याआधी स्वच्छ धुवून मगच त्याचे सेवन करावे. तसेच मधुमेही व्यक्तीने आणि गरोदर स्त्रियांनी  याचे सेवन करताना त्यांच्या शाररिक गरजेनुसार प्रमाण डॉक्टरांकडून जाणून घेऊन मगच करावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon