Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

गरोदरपणात केशर खाण्याचे फायदे . . .२


केशरात ए जीवनसत्व, फोलिक अ‍ॅसिड, तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मँगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम आणि इतरही काही पोषक घटक मिळतात. त्याशिवाय केशरात लाईकोपिन, अल्फा कैटरिन, बीटा कॅरोटीन हे गुणही असतात. हे घटक शरीराचे काही आजारांपासून बचाव करतात. केशर आरोग्यासाठी चांगले असतेच पण सौंदर्यासाठीही त्याचा फायदा होतो. केशराचा वापर बहुतेकदा पक्‍वान्‍न तयार करताना केला जातो. त्याचा रंग आणि स्वाद पदार्थाची लज्जत वाढवतो. केशर प्रकृतीने उष्ण असते. त्यामुळेच केशराचे सेवन हिवाळ्यात करणे लाभदायक असते. केशराचे माहीत नसलेले काही फायदे जाणून घेऊया.

ताप दूर होतो 

केशरामुळे ताप, सर्दी, कफ दूर करण्यास मदत होते. एक ग्लास दुधामध्ये चिमूटभर केशर आणि मध मिसळून ते प्यावे. त्याशिवाय केशरात पाणी घालून लेप तयार करावा. हा लेप मान, छाती वर लावावा. हिवाळ्यात होणार्‍या सर्दीपासून आराम मिळतो.

चेहर्‍याचे सौंदर्य 

केशरामध्ये चंदन आणि दूध मिसळून तो फेसपॅक वीस मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यात धुवून टाका. आठवड्यातून एक दोन वेळा हा पॅक लावल्यास चेहर्‍याचा रंग उजळेल.

वयवाढ रोखते 

केशरामध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने व्यक्‍तीचे वय वाढू देत नाही. कच्च्या पपईत चिमूटभर केशर टाकून ते मिसळून चेहर्‍यावर लावल्यास स्वच्छ, निरोगी आणि मुलायम करण्यात मदत होते.

नैराश्यापासून मुक्‍ती 

 ज्या व्यक्‍तींना नैराश्य येते त्यांच्यासाठी केशर खूप उपयुक्‍त ठरते. केशरामध्ये सेरोटिनन आणि इतर रसायने असतात. त्यामुळे केसर आपल्याला उदासी येऊ देत नाही. रोज केशराचे दूध प्यायल्यास रंग उजळतोच परंतु नैराश्याची समस्याही दूर होते.

द‍ृष्टी 

 हल्ली लहान मुलांनाही कमी दिसणे, चष्मा लागणे या गोष्टी सर्रास पाहायाल मिळतात. रोज केसराचे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.

मासिक पाळीच्या वेदना : काही महिलांना मासिक पाळीत पोटात वेदना होतात. चिडचिड होते, थकवा, सूज येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. रोज केशराचे दूध किंवा चहा प्यायल्यास फायदा होतो.

अस्थमा किंवा दम्यापासून बचाव 

हिवाळ्यात दमेकरी व्यक्‍तींना खूप त्रास होतो. त्यासाठी दिवसातून 3-4 वेळा केशराचा चहा प्यायल्यास दम्याची समस्या दूर होते.

डोकेदुखी होते बरी 

 चंदनाबरोबरच केशर मिसळून ते कपाळावर लावल्यास डोळे, मेंदू यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचते. हा लेप वापरल्याने डोकेदुखीपासून मुक्‍ती मिळते.


Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon