कोरड्या त्वचेसाठी
* निंबाचे पावडर घ्या आणि त्यात द्राक्षाचे बीचे तेल थोडेसे थेंब टाका. आणि त्याचे पेस्ट बनवून घ्या.
* त्याचे पेस्ट आता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि गार पाण्याने चेहरा धुवून काढा.
आता केशर चा उपयोग तुम्हाला करायचा आहे हे महाग वाटेल पण ते चेहऱ्यावर परिणामकारक असते.

केशरचे सौन्दर्यासाठी उपयोग
ह्यामुळे टॅन त्वचा सुंदर होते
* ह्यासाठी थोडेसे केशर घ्या आणि ते रात्री थरीच्या दुधात भिजवून ठेवा.
* आता ते द्रावण मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि सकाळी टॅन झालेल्या त्वचेवर लावा.
आणखी
* गुलाबाचे पाणी घ्या आणि त्यात थोडेसे केशर घाला.
आणि त्यानंतर कापसाच्या बोळा घेऊन त्याला चेहऱ्यावर अलगद पाने लावा.
अजून

* काही धागे केशराचे घ्या आणि दुधात त्याला अर्धा तासांपर्यंत भिजवून ठेवा.
आणि त्यानंतर १ चमचा चंदनाची पावडर घ्या आणि त्या मिश्रणात टाका.
* आत ती पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटपर्यँत राहू द्या. आणि नंतर त्याला पाण्याने धुवा.
मध ही तर सगळ्यांनाच आवडत असते आणि सौन्दर्यात ह्याचा वापरही खूप केला जातो. आणि ही सहज मिळणारी, रसाळ आणि स्वस्त आहे.
* तुम्ही गावठी मध मिळलेच तर ते चेहऱ्यावरील पुरळवर लावू शकता. मध हे अँटिसेप्टिक आणि नॅचरल असते.
मध हे चेहऱ्यावर लावल्यावर पुरळ तर कमी होतातच पण असतील तेही जातात.
* मधामुळे तुमची त्वचा ही नैसर्गिक व तजेलदार होते.

* आता मधामध्ये थ्री किंवा मलाई मिसळा त्यात चंदन, बेसन आणि गुलाब तेल मिसळून त्याचा फेस पॅक तयार करा.
आता हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.
आणि ह्या थराला मास्क म्हणून थोडा वेळ राहू द्या. आणि नंतर काढा. ह्यामुळे चेहऱ्यावरची घाण निघून जाऊन चेहरा हा मऊ होतो.
