Link copied!
Sign in / Sign up
105
Shares

केसरचा गरोदरपणाला होणारा फायदा


गरोदरपणात केसर खाल्याचा माझ्यावर व माझ्या बाळावर काही परिणाम होतो का ? आणि केसर खाण्याचे कोणते फायदे माझ्या बाळाला होतील. अशी शंका काही मातांना असते. कारण आपल्याकडे जडी - बुटीचे खूप आकर्षण आहे. आणि त्यातच केसर सारखी जडी - बुटी म्हणजे जबरदस्त. तेव्हा ह्या केसरचा फायदा कितपत आपल्याला होतो आणि त्याचा गरोदरपणाशी काय संबंध हे आपण ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ. 

१) चीड-चीड कमी होते

गरोदरपणात तुम्हाला माहितीच आहे की, हार्मोनल बदलामुळे तुमच्या शरीरात काही ना काही बदल होत असतात आणि तुमचा मूड खूप बदलत असतो. थोड्या - थोड्या वेळात तुम्ही चीड-चीड व्हायला लागतात. काहीवेळा खूप रडू येते आणि रडतही असतात. आणि ह्याचा परिणाम तुमच्या बाळावर तर होतोच पण ह्याचा वर्तमानात खूप त्रासही होत असतो. तेव्हा ह्यावेळी केसर खूप कामास येते. केसर एंटी-डेप्रेस्सेंट चे काम करत असते. ह्यामुळे तुमच्या मूड मध्ये बदल होतो. आणि ह्याचा दुसरा फायदा असा की, गरोदरपणात जो त्वचेवर बदल होतो त्यामध्ये केसर त्वचेला तजेलदार बनावट असते. ह्याचा फायदा तुमचा आत्मविश्वास वाढण्यात होत असतो.

२) रक्त दाब कमी होण्यास मदत होते

वजन जास्त असलेल्या मातांना आणि गरोदर स्त्रियांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. आणि गरोदरपणात हाय ब्लड प्रेशरची समस्या खूप धोकादायक असते. आणि त्याबाबत खूप काळजी घ्यावी लागत असते. तेव्हा ह्यावेळी जर तुम्ही केसर घेतले तर पोटैशियम आणि क्रोसेटिन हे घटक शरीरातून कमी होतात आणि त्यामुळे ब्लड प्रेशर घटण्यास खूप मदत होत असते.

३) मळमळ दूर करते

गरोदर असताना सकाळी खूप उलट्या आणि मळमळ होत असते. आणि हे हार्मोन्स बदलामुळे होते. तेव्हा केसर घेतल्यामुळे हा त्रास होत नाही. त्यामुळेच पुरातन काळात गर्भवती स्त्रीला सकाळी केसर टाकून चहा दिला जायचा. आणि ह्याबाबत तुमच्या आईणी कधी ना कधी बोलण्यात सांगितले असेल.

४) पेन किलर म्हणून

जस जसे तुमचे बाळ पोटात वाढते तशी त्याला जागा लागत असते. त्याचे स्नायू आणि हाडे वाढत असतात तेव्हा तुमच्या पोटात व शरीरात वेदना सुरु होतात. त्यासाठी केसर पेन किलर म्हणून काम करते आणि हे नैसर्गिक पेन किलर आहे. ह्यात तुमच्या वेदना व दुःख कमी होऊन जाते.

५) आयरन वाढवण्यास मदत

गर्भवती स्त्रियांना शरीरात रक्ताची खूप कमी असल्याने त्यांना प्रसूतीच्या वेळी खूप त्रास होत असतो. आणि त्यामुळे डॉक्टर, सरकार, आयरन वाढवण्यासाठी खूप सांगतात. त्यासाठी केसर तुम्हाला खूप आयर्न देतच असते आणि हिमोग्लोबिन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवते. तुम्ही केसर रोज थोडे - थोडे खाण्यात मिसळू शकता आणि ते खाऊ शकता.

६) मासिक प्रवृत्तीच्या वेळी होणारा त्रास कमी करतो, मासिक रजस्रावाचे प्रमाण वाढवितो, केशर हे गर्भाशय शोधक असल्याने प्रसूतीनंतर राहिलेले गर्भाशयातील दोष नाहीसे करण्यासाठी केशर वापरले जाते. ह्यासाठी केशर घातलेले दूध प्यावे.

तसे तर केसर खूप महाग आहे पण जर तुम्हाला ह्या त्रासातून सुटका हवी असेल तर थोडे थोडे घ्यावे. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon