Link copied!
Sign in / Sign up
64
Shares

केसातला कोंडा आणि इतर केसाच्या समस्या वरील उपाय

केसातला कोंडा म्हणजे काय?

डोक्यावरची त्वचा सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. जुन्या पेशी मृत होऊन गळून पडतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. तापमानात वाढ होते तशी या पुर्ननिर्माण प्रक्रियेची गती वाढते. अधिक प्रमाणात आणि सतत पेशींचे गळून पडणे सुरू होते. त्यामुळे केसांमध्ये काही वेळा पांढऱ्या छोटय़ा आकाराचे किंवा कधी खपल्यांसारखे निघालेले त्वचेचे थर दिसतात. केसातले हे त्वचेचे थर म्हणजेच कोंडा. केस कोरडे असतील तर हा कोंडा केस विचरताना पडतो. तेलकट केसांमध्ये डोके खाजवल्यावर तो सुटा होऊन दिसू लागतो.

अश्याप्रकारे घ्या केसांची काळजी

१. ज्यांना सकाळी लवकर बाहेर पडायला लागतं त्यांनी संपूर्ण  केस झाकतील असे स्कार्फ वापरा.

२. आठवडय़ातून एकदा तरी केसांना डीप कंडिशननिंग करा. यामुळे केसांना मॉइश्चर मिळेल. तसंच शॅम्पू केल्यावर केस अतिशय कोरडे होतात. त्यामुळे शॅम्पू केल्यावर केसांना तेल लावावं. म्हणजे त्यांना पोषण मिळेल. आणि ते मऊ आणि चमकदार दिसतील.

३. आठवडय़ातून किमान दोन ते तीन वेळा केस शॅम्पूने धुतल्यास कोरडे होण्यापासून वाचतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमचे केस कोरडे असले पाहिजेत. दुसरं असं की ओले राहिले तर तुमच्या केसातलं मॉइश्चर थंड हवेमुळे तिथेच थिजू शकतं. जेणेकरून तुमचे केस कोरडे होणार नाहीत आणि तुटणार नाहीत.

४. हिवाळ्यात नियमितपणे म्हणजे दर सहा ते आठ आठवडय़ांनी तुम्ही तुमचे केस ट्रीम करा. म्हणजे केस दुभंगणार नाहीत

उपाय 

केसातील कोंडा कमी होण्यासाठी आणि केसांच्या समस्या कमी होण्यासाठी खालील उपाय करून पहावे. 

१. खोबरेल तेल केसाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि लिंबूरस केसांतील कोंडा दूर करण्यासाठी उपयोगी असते. तेल लावण्यासाठी अगोदर खोबरेल तेल गरम करा आणि यामध्ये लिंबूरस मिक्स करा अंघोळीच्या अगोदर २ तास हे तेल लावून मालिश करा.

२. केसातील कोंडा कमी करण्यास लाकडी कंगव्याचा उपयोग होतो. लाकडी कंगव्याच्या डोक्यांच्या त्वचेमध्ये निर्माण होणारा तेलकटपणा कमी होतो. परिणामी कोंडा कमी होण्यास मदत होते.

३. जास्वंद फुलांची पेस्ट आणि नारळाचे तेल काही वेळ उकळू दया. यानंतर याला थंड होऊ दया आणि डोक्याच्या त्वचेवर लावून रात्रभर ठेवा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon