Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

केसांच्या निरोगीपणासाठी ह्या गोष्टी खा च !

 केस आणि केसांचे आरोग्याबाबत आता खूपच लोक सावध झाली आहेत. स्त्रिया सुद्धा आता स्वतःच्या केसांना खूप जपू लागल्यात कारण केस गळणे किंवा विरळ होणे ही कॉमन समस्या होऊन गेली आहे. आणि केस हे सौन्दर्याचा दागिनाच मानला जातो. आणि आम्हाला काही व्यक्तींनी विचारले की, केस सदृढ राहतील त्यासाठी काय करू. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला केसांच्या निरोगीपणासाठी कोणती फळे खावीत ते सांगितले आहे.

१) आहार जर उत्तम असेल तर केसांची समस्या येत नाही, कारण आता पिझ्झा व बर्गरच्या जमान्यात मुखत्वे अन्न हे निकृष्ट खाल्ले जाते. त्यामुळे केसांचे पोषण होत नाही. तेव्हा हे केसांचे व तिथल्या पेशींचे पोषण होण्यासाठी काही जीवनसत्वयुक्त आहार घ्यावाच.

२) केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. आहारात बदमासोबत फळांचा समावेश करायला हवा.  

३) दिवसातून एक सफरचंद खाल्ल्यास त्याचा केसांची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. तसेच सफरचंदात असणारे फेनॉलिस आणि बायोटीन या घटकांमुळे केसांच्यां मूळांतील ताकद वाढते.

४)  पेरुमध्ये कॅल्शियम आणि इतरही शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. पेरुत असणाऱ्या अ जीवनसत्त्वामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही रोज एक पेरु खाल्लात तर नक्कीच तुमचे केस चांगले वाढतील.

५) संत्र्यामध्ये किंवा मोसंबी ह्या फळात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे केस वाढण्यास मदत होतेच. पण त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यासही मदत होऊन केसांची चमक वाढते. संत्री केसांच्या आतील त्वचा आणि मूळे बळकट होण्यासही फायदेशीर असते.

६) लालभडक रंगाची  स्ट्रॉबेरीमध्ये असणारे पोषक घटक केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरीमध्ये सिलिका, जीवनसत्त्व ब आणि क असते त्यामुळे केसांचा पोत सुधारतो.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon