Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

केसांच्या दुर्गंधीवरती हे घरगुती उपाय नक्की करून पहा.


केसांमधून घामामुळे किंवा इतर कारणांमुळे येणारी दुर्गंधी तुमच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरू शकते. यामागे अनेक करणे असू शकतात जसे की तेलकट स्काप्ल , कोंडा, डोक्याच्या त्वचेला कंडीशनर लावणे, खूप घाम येणे, प्रदूषण किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होणे. कधी कधी संप्रेरकांच्या असमतोलामुळे किंवा अस्वच्छ राहणीमानामुळे देखील ही समस्या संभवते. खाली दिलेल्या सोप्या आणि सहज अशा घरगुती

उपायांनी तुम्ही केसांची ही दुर्गंधी घालवू शकता.

१.लसूण तेल

लसून जरी उग्र वासाचे असते तरीही याचा उपयोग तुम्ही केसांमधून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी करू शकता. लसणामध्ये सल्फर असते. सल्फर एक उत्तम जंतुनाशक आणि अॅंटिबॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल आहे.

घरच्या घरी हे तेल बनवण्यासाठी लसणाच्या ३ ते ४ काड्या नारळाच्या तेलामध्ये उकळून घ्या. या तेलात कापूस बुडवून तुमच्या स्काल्पवर सगळीकडे पूर्णपणे लावा. २० मिनिटांनी शाम्पूने केस धुवा. हे तेल बाजारात देखील तुम्हाला मिळू शकते.

२. कोरफड.

कोरफडीच्या पोषणात्मक गुणांमुळे त्वचेविषयक आणि केसांविषयक दोन्ही प्रकारच्या सौंदर्य र्साधनांमध्ये कोरफडीचा वापर वाढता आहे. फेस क्रीम, फेस वाॅश किंवा शाम्पू, आज सगळ्यांमध्ये कोरफड वापरली जाते. कोरफड त्वचेला ओलावा प्राप्त करून देते. यामुळे कोरड्या झालेल्या डोक्याच्या त्वचेत जे जास्तीचे तेल शोषले जाते ते थांबते आणि तुम्हाला एक फ्रेश अनुभव मिळतो.

सर्वात आधी शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. यानंतर कोरफडीची २ पाने घेऊन त्यांना मधोमध चीरा. त्यातील गर काढून घेऊन हा गर केसांना आणि स्काल्पला सगळीकडून लावा. वाळल्यावर १५-२० मिनिटांनी हे धुवून टाका.

३. कांद्याचा रस.

ज्याप्रमाणे आपण लसणाचा उपयोग बघितला त्याचप्रमाणे कांद्यात देखील सल्फर असते. काढ्याचा रस अॅंटिबॅक्टेरिअल असतो. केसातून येणारी दुर्गंधी कमी करण्यास याचा उपयोग होतो. यामुळे केसांची वाढ होण्यास देखील मदत होते. ज्यांना टकलेपणाची समस्या आहे त्यांनी कांद्याचा रस डोक्याच्या त्वचेला लावावा.

कांदा ४ फोडीत कापून घ्या, त्यानंतर कांद्याचा रस काढण्यासाठी मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट बनवा. ही पेस्ट एक सुती कापडातून गाळून घ्या. हा रस कापसाने डोक्याला लावून १५ ते २० मिनिटे ठेवा आणि नंतर शाम्पूने केस धुवा.

५. टोमॅटो ज्यूस.

टमाट्यात लोह आणि विटामिन्स मुबलक प्रमाणात असतात. याने तुमच्या स्काप्लची अॅसिडीटी बदलते ज्याने बॅक्टेरियाचा नाश होतो. टमाट्याच्या रसाने केसांना नवीन चमक येते आणि सोबतच कोंडा नाहीसा होण्यासही मदत होते.

कोरड्या केसांवर हा ज्यूस लावावा. धुतलेले टोमॅटो  ज्यूसरमधून काढून त्यांच्यातील रस एका वाटीत काढून घ्या. हा रस कापसाच्या बोळ्याच्या सहाय्याने केसांच्या त्वचेला आणि केसांना लावा. ५ -१० मिनिटानंतर केस धुवून टाका. याचा वापर कंडीशनर सारखा करता येईल.

६. टी ट्री ओईल .

टी ट्री ओईल मध्ये केसांची दुर्गंधी घालवण्यासाठी उत्तम असे गुणधर्म असतात. हे एक चांगले अँटिआॅक्सिडेंटस् असून याने केसांमधील कोंडा देखील निघून जाण्यास मदत होते. यातील माय्क्रोबियल गुणधर्म केसांमधून येणारा वास दूर ठेवतात.

या तेलाचे ४-५ थेंब पाण्यात टाकून या पाण्याने केस ओले करा. थोड्यावेळाने केस सल्फेट नसणाऱ्या शाम्पूने धुवा.

७. लिंबाचा रस.

केसांमध्ये इन्फेक्शन किंवा कोंडा झाला असेल तर लिंबू हा त्यावर एक उत्तम आणि स्वस्त असा उपाय आहे. लिंबाने घामाचा वास लगेच दूर होतो आणि नंतर घाम आल्यास त्याचा वासही येत नाही.

एक लिंबू २ कप पाण्यामध्ये पूर्ण पिळून घ्या. हे पाणी वापरून तुमचे केस धुवा किंवा ओले करा. अर्धा तासाने केस साध्या पाण्याने धुवा. लिंबाने केसांना चमक येईल.

८. अॅपल सीडर विनेगर.

अॅपल सीडर विनेगरमध्ये अनेक क्लीन्सिंग प्रोपर्टिज असतात. तुमच्या स्काप्लचा पीएच नियमित करून त्यातून येणारी दुर्गंधी आणि इन्फेक्शन यामुळे दूर होतात. हे केसांसाठी एक उत्तम स्मूथनर आणि कंडीशनर आहे.

तुमच्या नेहेमीच्या शाम्पूने केस धुवा. धुतलेल्या केसांवर एक झाकण अॅपल विनेगर १ ग्लास साध्या पाण्याचे मिश्रण ओता. हे मिश्रण २ मिनिटांपेक्षा जास्तवेळ केसांवर ठेवू नका. यानंतर साध्या पाण्याने पुन्हा केस धुवा.

केसांमधून येणारी दुर्गंधी ही सार्वजनिक ठिकाणी इम्बॅरेसिंग असते. या दुर्गांधीवरील उपाय म्हणून वरील उपचार तुम्ही नक्की करून बघा. सकस आहार, चांगला शाम्पू, केसांना नियमित कंडीशन करणे आणि कोमट पाण्याने केस धुणे अशा सवयी बाळगा. तुमच्या केसांच्या टेक्सचर नुसार योग्य शाम्पूची निवड देखील महत्वाची भूमिका बजावते. शक्यतो जेल किंवा हेअर स्प्रे वापरणे टाळा. यातून ही समस्या अजून वाढण्याची शक्यता असते.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon