Link copied!
Sign in / Sign up
55
Shares

केसांची निगा आणि काळेभोर हेयर साठी घरगुती उपाय

this image for how to take care of hair in marathi language


जर स्त्रियांना कोणी प्रश्न विचारला की, तुझ्या सौन्दर्यातला कोणता भाग तुला खूप प्रिय आहे त्यावेळेस ती कोणताच विचार न करता सांगेल की, माझे काळेभोर मुलायम केस. आणि ह्याबाबत तुमचेही मत हेच असेल. तर केस स्त्रियांसाठी सुंदरतेचा ठेवा आहे. आणि त्या सुंदरतेच्या वास्तूला कशा प्रकारे आणखी सुंदर करायचे आणि सुंदरता कशी राखून ठेवायची. ह्याविषयी पूर्ण माहिती ह्या ब्लॉगमधून देत आहोत.

कोणते केस खूप आकर्षित असतात ही गोष्ट बघणाऱ्याच्या दृष्टीवर असते. तसे भारतात लांबसडक व काळेभोर केस हे उत्तम सुंदर केसांचे मोजमाप आहे. पण तेच यूरोपात आखूड व स्टाईल असलेले केस सुंदर समजतात. तेच आफ्रिकेत कुरळे केस आवडतात. पण केस पूर्ण जगातच आकर्षित करण्याची गोष्ट आहे.

केसांच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नारळाचे दूध हे केसांसाठी खूप उपयुक्त ठरते. एक दिवसाआड किंवा कमीत-कमी आठवड्यातून एकदा तरी खोबऱ्याचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा आणि रात्रभर तसेच असू द्या आणि सकाळी केस धुवा. तासाभराने केस धुऊन टाका. ओले खोबरे किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा. आणि ते रात्रभर ठेवा रात्री झोपताना त्याला काही ताई कापड वैग्रे बांधून झोपा अन्यथा मुंग्या येण्याची शक्यता असते. दिवसभर लावून दुपारी देखील धुता येईल

खोबरे /नारळ याप्रमाणेच मेहंदीच्या पानांचा देखील केसांच्या समस्यांमध्ये मेहंदीची पाने उपयुक्त ठरतात. तसेच केसांना नैसर्गीकरित्या रंग देण्यासाठी देखीलमेहंदीचा वापर करण्यात येतो. केसांची मुळे घट्ट करण्यात देखील उपयुक्त मानण्यात येतात. २५० ग्रॅम मोहरीच्या तेलात ६० ग्रॅम मेहंदीची धुतलेली पाने पाने घाला. नंतर हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या. आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा आणि उरलेले तेल एखाद्या हवाबंद बाटलीत भरून ठेवा. कोरडी मेहंदी पावडर पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठवल्याने देखील फायदा होतो

शिकेकाईचा वापर कसा करावा ?

 

शिकेकाई आणि सुका आवळा चांगला ठेचावा.किंवा या दोन्हीची पावडर रात्रभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी कापडाने हे पाणी गाळताना या कापडाने ते दाबून एकत्र करावे. या पेस्टने केसांना हलकेच मालीश करावी. नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी अंघोळ करावी. केस वाळल्यानंतर खोबरेल तेल लावावे. असे केल्यास केस काळे, दाट, लांबसडक आणि चमकदार होतात. विशेष म्हणजे, शिकेकाई आणि आवळा वापरल्यास केस कधी पांढरे होत नाहीत आणि ज्यांचे पांढरे झालेत ते काळे होतात.

सुमारे 250 ग्रॅम अमरवेल तीन लिटर पाण्यात उकळा. जेव्हा पाणी अर्धे उरेल आणि अमरवेल पाण्यात पूर्णपणे विरघळेल तेव्हा पातेले उतरवा. सकाळच्या वेळी या पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, दाट आणि लांबसडक होतात.

केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. मासे, सोया, कॉटेज चीझ आणि डाळी यांचा आहारात समावेश करावा. संत्र, पिवळी फळे आणि भाज्यांत बीटा केराटीन आढळते. बी १, बी६, बी १२, सी आणि ए विटॅमिन केसांसाठी पोषक असते. शाकाहारी असणाऱ्यांनी दोन टेबलस्पून प्रोटीनयुक्त पावडरचा आहारात समावेश करावा.

केसांची काळजी व निगा कशी राखायची

*  केव्हाही ओले केस विंचरू नयेत.

*  केसांमधला गुंता प्रथम बोटांनी सोडवावा. लक्षात घ्या की, केस विंचरताना कमऱ्यात वाकून केस चेहऱ्यावर आणा आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरा. जर तुम्हाला रक्ताभिसरण उत्तम करायचे असेल तर कमीत कमी १०० वेळा केसांत कंगवा फिरवणे आवश्यक आहे.

*  शॅम्पू केल्यानंतर केसांना प्रोटीनयुक्त कंडिशनर लावावेत.

*  घरगुती उपाय म्हणून, जोजोबा तेल, कोरफड आणि सोडीअम लॉरेथ सल्फेटयुक्त शॅम्पूने केस धुवावे. कंडिशनर लावताना कानाच्या मागील केसांपासून केसांच्या टोकापर्यंत लावावे. डोक्यावरील त्वचेला कंडिशनर लावू नये. कंडिशनरमुळे केस मजबूत, चमकदार होतात.

*  केस कोरडे असताना कंडिशनर लावावे आणि कोमट पाण्याने ते धुवून काढायचे.

काही आणखी घरगुती उपाय

this image about how to take care hair in marathi language

*  केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र धुवू नयेत. त्यामुळे केसांत गुंता होवू शकतो. केस मोकळे सोडून मगच केसांना शॅम्पू लावावा व ते धुवावेत.

*  केस धुतल्यानंतर केस नैसगिर्कपणे कोरडे होवू ब्लो ड्राइंग करण्याआधी केसांना कंडिशनरही लावू शकता. (हेअर ड्राइंग मशिन कोल्ड मोडवर ठेवावी) केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून केस कोरडे करू नयेत. डोक्याला पाच ते सात मिनिटे टॉवेल बांधावा आणि हलक्या हाताने केस पुसावेत.

*  डॅन्ड्रफ, पुरळ किंवा डोक्याला खाज उठत असेल तर त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अँटी डँन्ड्रफ लोशन रात्री लावावेत. जेणेकरून केस कोरडे होणार नाहीत. आठवड्यातून एकदा नरिशिंग कंडिशनर लावल्याने तसेच रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केस चमकदार होतात.

*  तेल हे केसांसाठीचं उत्कृष्ट प्री-कंडिशनर आहे. खोबरेल तेल यासाठी चांगलं. तेल केसांच्या आत झिरपतं आणि केसांना आतून संरक्षण देतं. केसांना नियमितपणे तेल लावल्यास केस मजबूत, मऊ आणि प्रदूषणाशी दोन हात करण्यास अधिक सक्षम बनतात.

योग्य तेलाची निवड कशी करावी ?

* नारळ मुख्य घटक असणारया तेलाची शिफारस करेन. कारण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय पद्धतीने संशोधन झालं आहे आणि ते केस तसंच स्काल्पसाठी उत्कृष्ट असल्याचं त्यातून दिसून आलं आहे.

*  केस निरोगी राखण्यासाठी ते किती वेळा धुतले पाहिजेत ?

*  हे खरंतर तुमची केसांखालची त्वचा कुठल्या प्रकारची आहे तसंच केसांची अवस्था कशी आहे, यावर अवलंबून असतं. त्यानुसार आठवड्यातून एकदा की चारदा हे ठरवता येईल.

*  शॅम्पूचा ब्रॅण्ड बदलत राहावा. एकाच ब्रॅण्डचा शॅम्पू सातत्याने वापरल्याने स्काल्पवर एक प्रकारचा थर जमू लागल्याने त्वचा सोलवटायला आणि कोरडी पडायला सुरुवात होते. काही महिन्यांतून एकदा बेबी शॅम्पू किंवा सल्फेटमुक्त शॅम्पू वापरावा.

*  सल्फेटसारखे शॅम्पूमधले घटक तसंच स्ट्राँग अॅण्टि-डॅण्ड्रफ शॅम्पूमधल्या घटकांमुळे स्काल्पची त्वचा तसंच केस शुष्क होऊ शकतात. ते खराब व्हायला सुरुवात होते. शॅम्पूमधले घटक जितके सौम्य तितका तो केसांसाठी चांगला.

*  अॅण्टि डॅण्ड्रफ शॅम्पू तीव्र असल्याने ते नियमितपणे वापरल्यास केसांची हानी होते, हे कितपत खरं आहे?

*  हे शॅम्पू वारंवर वापरल्याने टाळूची त्वचा कोरडी होतेआणि केस गळायला सुरुवात होते. त्यामध्ये सौम्य शॅम्पूचे

कोंड्यापासून सुटका होण्यासाठी कोणते घरगुती उपाय योजता येतील ?

how to take care of hair and for that home remedies in marathi language

*  दही, मेथीदाणे आणि लिंबाचा रस हे घटक एकत्र करून त्याचा पॅक बनवून तो केसांना लावल्याने टाळूची त्वचा निघण्याचं प्रमाण कमी होतं. आहारात प्रथिनं आणि दह्याचा समावेश केल्यासही हे साधता येईल.

*  वेगवेगळी हेअर स्टाइल करत राहिल्याने केसांचा पोत बिघडतो का?

नाही, केमिकल्सचा अतिरेकी वापर आणि अतिरिक्त हिटिंगमुळे केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

हेअर ड्रायरचा वरचेवर वापर केल्याने केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, हे खरं आहे का?

*  हो, हे खरं आहे. विशेषत हॉट मोड वापरल्यानंतर त्याचा परिणाम केसांवर होतो. केस धुण्यापूर्वी त्यांना तेल लावा. थोडं

लिव्ह-इन सिरम लावा आणि हेअर ड्रायरचा वापर कमीत कमी करा.

*  पर्मनण्ट स्ट्रेटिनग किंवा कलरिंग केसांसाठी घातक ठरू शकतं का ?

हो, या सर्व प्रोसिजर्समुळे केसांमधले बंध तुटतात आणि त्यामुळे केस अत्यंत नाजूक बनतात ज्यामुळे त्यांना चटकन हानी पोहोचू शकते. अशा केसांची खूप काळजी घ्यावी लागते.

केसांना कलर वापरणं सुरक्षित आहे का ?

केसांना लावायचे रंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सर्वच रंगांमुळे केस शुष्क बनतात आणि त्यांची आद्र्रता टिकवून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने ते अतिसंवेदनशील बनतात ज्यामुळे त्यांना चटकन हानी पोहोचू शकते.

केसांना वेगवेगळ्या शेड्चं कलरिंग चांगलं की वाईट ?

क्लोरिनेटेड पूल्स अत्यंत महत्त्वाचे असतात. ते जितके कमी तितकं चांगलं. केस कलर केल्यानंतरही केसांची योग्य ती काळजी घ्यायची असते. केसांना तेल लावणं, सौम्य शॅम्पू आणि कंडिशनर्स वापरणं हे कटाक्षाने पाळलं पाहिजे. चांगल्या टेक्श्चरच्या केसांना रंग सहजपणे लागतो तर शुष्क केसांना रंग लागायला वेळ लागतो. सर्व रंगांमुळे केस शुष्क बनत असल्याने त्यांना मॉइश्चरायिझगची गरज असते.

ह्या उन्हाळयात केसांची काळजी कशी घ्याल ?

*  सध्या उन्हाळा चालू आहे म्हटल्यावर तुम्हाला बाहेर जायला खूप आवडत नाही कारण उन्हामुळे केसांची अवस्था ही वाईट होऊन नंतर परिस्थिती केस गळण्यात होते. खूपच ऊन पडतंय म्हटल्यावर कामासाठी, किंवा इतर काही गोष्टींसाठी तर बाहेर जावे लागणारच आहे. तेव्हा ही गोष्ट करू शकता की, कशा पद्धतीने तुमच्या केसांची काळजी ह्या दिवसात घेता येईल. आणि ती कशी घ्यावी. आणि जर तुम्ही ही काळजी घेतली नाही तर तुमच्या केसांसाठी नवीन हा उन्हाळा नवीन समस्या घेऊन येईल.

*  ह्यामुळे केसात डॅन्ड्रप, केस कमकुवत होणे, केस कोरडे होणे, त्यातून केस जास्त गळणे आणि केसांची नैसर्गिक चमक कमी होणे. अशा समस्या येऊ शकतात. आणि प्रत्येक स्त्रीसाठी केस ही खूप अमूल्य गोष्ट आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकीलाच महत्वाची आहे. पुरुषांनाही आता केसाचे महत्व खूपच पटू लागलाय म्हणून केसांबाबत खूप पैसे खर्च करत असतात. तेव्हा इतका पैसा खर्च करण्यापेक्षा तुम्ही ही साधी - साधी व घरगुती उपाय करू शकतात.

*  आता तुम्हाला ह्या केसांविषयीच्या सर्व भीतीदायक कल्पना मनातून काढायच्या असतील तर त्यासाठी अगोदर सोप्या - सोप्या गोष्टी करून ठेवायच्या,

केव्हाही बाहेर पडताना लक्षात घ्यावे की, तुम्ही केसांना रुमाल गुंडाळला आहे का ? जसे की, आपल्याकडे खूप मुली आणि स्त्रिया स्कार्फ घालतात. ही उन्हाळयात खूप आवश्यक गोष्ट आहे ह्यातुन त्वचा व केसांची सुरक्षा होते.

ओली केस घेऊन बाहेर उन्हात पडू नका.

*  ह्या दिवसामध्ये केमिकलयुक्त कॉस्मेटिकस लावू नका. कारण अगोदरच उन्हाची व त्या कॉस्मेटिकस मध्ये रासायनिक reaction होऊ शकते. त्यामुळे कलरिंग आणि केमिकल युक्त क्रीम वापरूच नका. वाटल्यास उन्हाळा संपल्यावर तुम्ही वापरू शकता.

*  कंडिशनर हे ह्या दिवसात केसांसाठी चांगले लाभदायक असते. ऊन तुमचे केस ड्राय करत असते तेव्हा कंडिशनर हे तुमच्या केसात आद्रता (मॉइस्चरायझर) टिकवून ठेवत असते. आता कंडिशनर तुमच्या केसांच्या नुसार ठरवून घ्या.

*  शाम्पू दररोज ह्या दिवसात करू नका, आणि शाम्पू सुद्धा करताना योग्य पद्दतीने करावा. कारण स्काल्प ह्यावेळी कोरडा असतो आणि त्यात आणखी डॅन्ड्रप वाढू शकतो. म्हणून ह्या उन्हाळ्याच्या दिवसात कमी वेळा शाम्पू करा.

*  ह्या दिवसात पार्लर मध्ये जाऊन heat असलेली उपकरणे केसांवर वापरू नका. आणि जास्त ऊनही डोक्यावर घेऊ नका. Air -dry च्या ऐवजी Blow - Dryer वापरा. आणि त्याचबरोबर curlers आणि styling irons दूर ठेवा ह्या उन्हाळयात तर त्यांना वापरूच नका.

*  दररोज केसांवर ट्रिमिंग घेऊ नका, ह्यामुळे केसांची खूपच दुरवस्था होते. केसांचा लूक बिघडतो. वाटल्यास त्याऐवजी तुम्ही स्मॉल ट्रिमिंग वापरू शकता.

*  तुम्हाला कुणाच्या लग्नात जायचे असेल किंवा एखाद्या कार्यक्रमात तर तेव्हा तुम्हाला तुमच्या केसांना कलरिंग करायचे वाटत असेल तर उत्तम प्रतीचा किंवा नैसर्गिक कलर चा ब्रँड निवडा कारण केमिकलयुक्त असेल तर उन्हाची व त्या रासायनिक द्रव्याची reaction होऊ शकते. आणि त्यात केस आणखीनच बिघडतील म्हणून ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आणि हे खरंय.

*  ह्या दिवसात खूप पाणी प्या. जेणेकरून तुमच्या शरीरात खूप ओलावा किंवा मॉइस्चरायझर टिकून राहील.

आणि काही आवश्यक आणि घरगुती उपाय तुम्ही ह्यावेळी करू शकतात.

for hair cute hair home remedies in marathi language

*  जास्वंद हे केशवर्धक असलेले आहे. आणि जास्वंद केसांच्या निरोगी व सुंदर आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यासाठी ह्या दिवसात तुम्ही सकाळी जेव्हा शाम्पू व कंडिशनर कराल तेव्हा जास्वंदीची फुले पाण्यात उकळून घ्या आणि ते उकळलेले पाणी नंतर केस धुण्यासाठी वापरा.

*  १ मोठा कप थंड पाण्यात त्यापेक्षा निम्मं अॅपल सायडर व्हिनेगर घालून केस धुवा. केस चमकदार होतील.

*  आपल्यापैकी बऱ्याचजणांना बियरचे सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत. बियरमुळे केस व त्वचा चमकदार होते. पाण्यात अर्धा कप बीयर घालून केस धुवा आणि फरक अनुभवा.

ग्रीन टी प्रमाणे यामध्ये देखील केसवाढीचे गुणधर्म असतात. ब्लॅक टी मध्ये असलेल्या कॅफेनमुळे केसांची वाढ होते. उन्हाळ्यात केस धुण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon