Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

केसांना तेल लावण्याबाबत काही प्रश्न... आणि उत्तरे

केसांना तेल लावावे की लावू ? केसांना कोणते तेल लावावे? केसांना तेल लावणे योग्य आहे का ? केसांना तेल कसे लावावे असे अनेक प्रश्न सगळ्यांचा पडत असतात. अश्या काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. 

१. बाहेर जाताना तेल लावावे का ?

केसांना तेल लावावे की लावू नये याबाबत अनेक लोकांची वेगवेगळी मते आहेत. यामध्ये अनेक जणांचे असे म्हणणे आहे. बाहेर जाताना तेल लावले तर बाहेरच्या वातावरणातील धूळ-धूर-प्रदूषक घटक,वगैरे कचरा केसांना चिकटण्याचा धोका असतो.ज्यामुळे केसांच्या मुळांशी कचरा जमून मुळं सैल होऊन केसांचे आरोग्य खराब होऊ शकते.

खरे तर केसांना लावले जाणारे तेल हे एक प्रकारचे आच्छादक आवरण तयार करते,जे वातावरणातील धूळ-धूर,कचरा वगैरे घटकांना केसांच्या मुळांशी जाण्यापासुन रोखते.तसेच डोक्याची त्वचा कोरडी होण्यापासून रोखते.

२. केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात का ?

हो केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते. डोक्‍यात कोंडा होणे, खवडे होणे वगैरे त्रास सहसा होत नाहीत, मात्र हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेल चांगल्या प्रतीचे, आणि केसांना उपयुक्त अश्या घटकांचा समावेश असलेले असावे. असे तेल केसांच्या मुळांना लावले की लगेचच आतपर्यंत शोषले जाते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते. मात्र कच्चे तेल म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही असे तेल कितीही शुद्ध असले, भेसळमुक्‍त असले तरी ते आतपर्यंत जिरण्यास अक्षम असल्याने केसांना तेलकटपणा आणण्याशिवाय फारसे उपयोगी पडत नाही.

 ३. केसांना तेल कसे लावावे 

१. केसांना तेल लावण्यापुर्वी ते किंचिंत गरम करावे व कोमट तेलाने केसांना मसाज करावा.

२. तेलात बोटं घालून , हाताने केसांचे भांग पाडून घ्या व टाळूवर हलक्या हाताने तेल लावा.

३. केसांवर तेल थापून ठेवू नका. गरजेपुरतेच तेल हातावर घेऊन टाळूवर मसाज करा.

४. तेल लावताना केस तळव्यांवर घेऊन चोळू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. टाळूवर १०-१५ मिनिटे मसाज करावा,यामुळे रक्तप्रवाह सुधारतो .

४. केसांना कोणते तेल लावावे ?

केसांच्या प्रकारानुसार आणि त्यांचा पोतानुसार कोणत्या प्रकारचे तेल लावावे हे आपण पाहणार आहोत.

सामान्य केस

सामान्य पोताचे केस हे अति तेलकटही नसतात व रूक्षही नसतात. अशा सामान्य केसांसाठी बदामाचे , खोबरेल किंवा आवळ्याचे तेल लावणे उपयुक्त आहे.

तेलकट केस –

डोक्‍याच्या त्वचेमधून “सीबम‘ नामक तेलकट स्त्राव वाहत असतो. यामुळे केस तेलकट होतात. त्यामुळे अश्या प्रकारच्या केसांसाठी ऑलिव्ह किंवा तीळाचे तेल अथवा खोबरेल लावणे हितकारी आहे.

रूक्ष केस-

रूक्ष केस हे कमकुवत, निस्तेज असल्याने त्याला फाटे फुटण्याची शक्यता अधिक असते. रुक्ष केसांमध्ये स्निग्धता वाढवण्याची गरज असते. बदाम, नारळ, तीळ, मोहरीच्या तेलाने मसाज करावा.

केसांत कोंडा असल्यास 

केसात कोंडा असल्यास टी ट्री ऑईल किंवा भृंगराज तेल वापरावे.अथवा कोमट खोबरेल तेल

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon