Link copied!
Sign in / Sign up
87
Shares

केसांना मेहंदी लावण्याआधी या गोष्टी नक्की वाचा


चाळीशी उलटल्यानंतर केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आजच्या धावपळीच्या युगात केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीरासाठी आवश्यक असणार्‍या पोषक घटकांची कमतरता, एखादा जुना आजार किंवा काहीवेळा औषधे यांच्यामुळेही केस पांढरे होतात.

केस पांढरे झाले की मेंदी लावणे हा त्यावरील उपाय आहे. पण कोणती मेंदी लावावी, त्यात कोणकोणत्या वनौषधी असाव्या हे अनेकदा माहित नसते. मेंदीचे मिश्रण संतुलित नसेल तर केस शुष्क होणे आणि पांढरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते. आपण अंदाजानेच मेंदीमध्ये वनौषधी टाकतो. पण हे प्रमाण संतुलित नसेल तर केसांसाठी ते अपायकारक ठरू शकते. जास्त काळ साठवून ठेवलेल्या वनौषधी वापरू नका. कारण त्या केसांना अपायकारक ठरू शकतात.

मेंदीत वापरण्यासाठी वनौषधींचे मिश्रण तयार करून घ्या. त्याने पांढर्‍या केसांना गर्द भुरा रंग तर मिळतोच सोबतच केस पांढरे होण्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यात प्रमुख हरीतकी, विभीतकी, आमलकी, घृतकुमारी, जास्वंद या वनौषधी आहेत.

 

प्रयोगाची कृती :

आवश्यक तेवढे पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमचे चहा पावडर टाकून उकळवून घ्या. हे पाणी गाळून घ्या. पाणी थंड करून त्यात 2-3 चमचे मिश्रण टाका. आवश्यक तेवढी मेंदी टाकून लेप बनवून घ्या. हे मिश्रण लोखंडी भांड्यात रात्रभर ठेवून द्या. दुसर्‍या दिवशी सकाळी केसांच्या मुळापासून संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा. दोन ते अडीच तास राहू द्या. हाताला लावतो तीच मेंदी वापरा. 'केसांना लावायची मेंदी' या नावाखाली जी मेंदी किंवा हिना मिळते तिचा वापर टाळा कारण यात धोकादायक रसायने असतात.

खालील काही महत्वाचे घटक जर मेहंदीमध्ये मिसळले तर नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफी दोन्हींमध्ये केस रंगवण्याची व अधिक तपकिरी करण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी चहा व कॉफीचे मिश्रण दाट असणे आवश्यक आहे. यासाठी चहा पावडर किंवा टी बॅग्सचा वापर करा. व ते गरम पाण्यात मिक्स करून त्याचा वापर करा.

दाट कॉफीदेखील फार उपयुक्त आहे. कॉफी पाण्यात उकळून ते मिश्रण केसांना लावल्यास गडद तपकिरी रंग मिळेल. यासाठी चहा किंवा कॉफीच्या पाण्यात केस बुडवून ठेवा. कॉफी डाय बनवण्याचा सोपा मार्ग म्हणजे कॉफी काही हेअर कंडीशनरसोबत मिक्स करा व केसांना लावा.

आवळा

आवळ्यात केसांना रंग देण्याची क्षमता नाही. मात्र आवळ्यामुळे केसांना चकाकी येते. त्यामुळे केसांना रंग लावण्याचा प्रक्रियेत अंतिम टप्प्यात आवळ्याची पावडर टाकावी. यामुळे रंग केल्यानंतर तुमच्या केसांना चकाकी येईल.

अक्रोडाची कवचे

अक्रोडाची टणक कवचं केसांना गडद चॉकलेटी रंग देण्यास मदत करतात. अक्रोडाची कवचं पाण्यात टाकून अर्धा तास उकळा. ते पाणी थंड होऊ द्या. नंतर केसांच्या ज्या भागावर रंग द्यायचा आहे. तेथे कापसाच्या बोळ्याने हे पाणी लावा. तासभर केस असेच राहू द्या. त्यानंतर केस सौम्य शाम्पू व पाण्याने धुवून टाका. मात्र गरम पाण्याने केस धुणे टाळा. यामुळे अपेक्षित परिणाम मिळणार नाही. या पाण्याच्या संपर्कात येणार्‍या वस्तूंचेदेखील रंग बदलू शकतात म्हणून हे पाणी तयार करताना विशेष काळजी घ्या.

केसासाठी काय करायला हवं ??

* केस खूप खरखरीत होत असतील तर मेंदी लावणं कमी/ बंद करायला हवं. एकुणातच केमिकल्सचा वापर शक्यतो नको.. म्हणजे कलरींग, हायलाइटस, पर्मिंग इत्यादी.

* कंडिशनर लावून २ तास केसात तसंच ठेवून मग धूवून टाकायचे केस.. हे १५ दिवसातून एकदा तरी नक्की. आणि केस धुण्यापूर्वी तेल लावणे मस्ट.

* शक्यतो राउंड ब्रश वापरू नये त्याने केस जास्त तुटतात. फ्लॅट ब्रश ने जास्त चांगले रहातात.

* शॅम्पू+कंडिशनर रूटिन मधून अधेमधे शिकेकाई+इतर औषधी वनस्पतींची पावडर उकळून गाळून घेतलेले पाणी याने केस धुणे आणि जास्वंद जेल चे कंडिशनिंग केल्यास केसांचे पोषण होते.

* केस हा अस्थि धातूचा मल आहे. अस्थिधातूच्या पोषणासाठी तीळ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तीळाचे सेवन केसांच्या आरोग्यसाठीही उपयुक्त ठरते.

केसांची निगा – समज / गैरसमज

केसांच्या चिकित्सेबद्दल विचार करताना शांपू आणि तेल ह्याशिवाय काही उपचार असू शकतो असे सर्वसामान्यांच्या मनातही येत नाही. ह्याचे मुख्य कारण आहे जाहिरातींचा भडिमार. ह्या उत्पादनांच्या इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात की नेमकं काय योग्य आहे हेच कळेनासं होतं.

* शांपूचा उपयोग

शांपू हा फक्त केस धुण्यासाठी वापरला जाणारा फेसाळणारा साबणासारखा (इमल्सिफायर) पदार्थ आहे. केसांवरील तेलकट अंश ह्यात विरघळतो आणि पाण्याने धुवून टाकला जातो. शांपूचा संपर्क केसांशी फक्त काही सेकंद असतो. तेवढ्या थोड्या वेळात त्याचा कोंड्याशी काय म्हणून संपर्क होणार? कोंडा हा एक त्वचा रोग आहे आणि त्वचारोगावर इलाज करायचा असेल तर जे काही औषध त्वचेवर लावाल ते निदान तासभर तरी त्या ठिकाणच्या त्वचेवर राहिले पाहिजे. शांपूचा परिणाम फक्त कोंडा वाहून नेण्यासाठी होऊ शकतो. कोंडा निर्माण होण्याची क्रिया त्याबे थांबू शकत नाही.

* हर्बल शांपू प्रकाराचे प्रस्थ सध्या फार वाढलेले दिसते. ह्या हर्बल शांपूमध्ये वनस्पतींच्या अर्काचा फक्त थोडासाच अंश असतो, बाकी सर्व रसायनेच असतात. रासायनिक घटक असल्यामुळे ते वाईट असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु हर्बल म्हणण्यासारखे त्यात वास्तविक काहीच नसते. केसांना मुलायम (हेअर सॉफ्टनिंग) करणारे, चकाकी (ग्लॉस) देणारे शांपूही आजकाल मिळतात. ह्या शांपुंमध्ये मुख्यतः रासायनिक स्निग्ध पदार्थ असतात, जे केसांना मुलायम करतात, गुंतागुंत होऊ देत नाहीत व चकाकी देतात. तरीदेखील हा कृत्रिमपणा केसांच्या स्वास्थ्यासाठी कितपत सुरक्षित आहे हा वादाचा मुद्दा आहे. शांपूचा दर्जा ठरतो त्याच्या pH वरून. शांपू हा अॅसिडिक किंवा अल्कलाईन नसावा, तो न्युट्रल असावा हे सर्वात महत्वाचे.

* केसांसाठी तेल आवश्यक आहे खरे, पण ते केवळ केसांना वर वर लावून उपयोगी नाही, तर ते मुळाशी शोषले जाणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार तेल नाकात टाकावे म्हणजे त्याचा परिणाम केसांच्या मुळांपर्यंत होतो. आयुर्वेदाच्या तत्वानुसार नाक हे शिरोभागाचे द्वार आहे. त्यातील यंत्रणा व श्लेष्मल स्तरांमधून द्रव्याचे शोषण होते.

* पुढचा महत्वाचा भाग आहे औषध पोटातून घेण्याचा. पोटात घेतलेल्या औषधी द्रव्यातील कार्यकारी घटक रक्ताद्वारे केसांच्या मुळांमार्फत केश संरक्षण व वर्धन करून अस्थि धातु पोषणाचेही कार्य करतात. झाडांच्या पानांवर पाणी किंवा खत शिंपडून उपयोग नाही तर ते पोषक घटक झाडाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. केसांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. आयुर्वेदात काही विशिष्ट वनस्पती व औषधी द्रव्ये ह्यासाठी वर्णित आहेत. ह्यांच्या सेवनाने अगदी ५ – ६ दिवसांतच फरक दिसू लागतो असे अनुभव प्राप्त झाले. साधारण दोन ते तीन महिन्यांत केसांची लक्षणीय वाढ दिसून येते. ही औषधे ३ महिने सातत्याने घेतल्यावर १५ ते २० दिवस बंद करुन पुन्हा चालू करावीत. एकच एक औषध सतत चालू ठेवण्यामुळे शरीर प्रतिसाद देणे बंद करते. म्हणून ही गॅप ठेवावी.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon