Link copied!
Sign in / Sign up
33
Shares

केसाला फाटे फुटणे या वरती उपाय

मेरे लंबे, घने, काले बालों का राज है अमूक अमूक तेल अशी जाहिरात काही वर्षांपुर्वी नेहमीच कानावर यायची. त्यातील लांबसडक, काळे केस मात्र आपल्याला कधी मिळतील याची प्रतीक्षा प्रत्येकीला असते. केस कोरडे, निस्तेज आणि फाटे फुटलेले असले की कसे सौदर्य वृद्धींगत होणार. त्यातही हल्ली धूळ, उन्हाचा कडकपणा वाढलेला असल्याने केस कोरडे पडणे आणि केसाच्या मुळाची फाटे फुटणे ही समस्या अगदी सर्वसामान्यपणे पहायला मिळते. बरं ही समस्या निर्माण झाली आणि काही उपायांनी ती कमी झाली असेही काही होत नाही. धुळ, प्रदुषण, उन्हाचा मारा सातत्याने होत असल्याने कोरडे केस निस्तेज होतात आणि लवकर तुटतातही. त्याशिवाय केसांवर रसायनांचा अतिवापर, सारखे सारखे केस धुणे यांचाही केसाला फुटी फुटण्यामध्ये एक कारण आहे. केसाला फुटी फुटल्या की मग केसाचे आरोग्य धोक्यात येते

केसाला फुटी फुटण्याचे कारण-

केसात विविध प्रकारचे शॅम्पू वापरणे.

रसायनयुक्त रंगाचे लेपन करणे

हेअर ड्रायरचा केस सुकविण्यासाठी वापर.

केसांना सतत इस्त्री अर्थात आयर्निंग करणे.

सतत विविध केसांच्या स्टाईल करणे

ओल्या केसात कंगवा फिरवणे.

नियमितपणे केसांची मुळे न कापणे

नियमित तेल न लावणे

कमी दर्जाचे कंगवे, पिना, रबर वापरणे

पोहताना अतिक्लोरिनयुक्त पाण्याचा प्रभाव.

लक्षणे-

जेव्हा केस वर बांधतो तेव्हा केसाच्या शेवटी रंग फिकट होत गेलेला दिसतो

केसांची लांबी असमान म्हणजे शेवटी वेडीवाकडी होते.

केस मोकळे करताना ते अधिक गुंतणे

केसाची चमक संपनणे आणि अगदी पातळ होणे

केसाच्या फाटे फुटण्यामुळे अर्थातच केसाचे आरोग्य धोक्यात येते. पण या समस्येवर घरगुती उपाय जरुर करता येतील.

फाटे फुटण्यावरील उपाय-

तेल-

नारळ तेल, बदाम किंवा ऑलिव्ह किंवा मोहरीचे तेल

कृती-

५०० मिलीलीटर नारळ तेलात चार चमचे ऑलिव्ह किंवा मोहरीचे तेल टाकावे आणि बदामाचे तेल टाकावे. ही सर्व तेले उत्तम प्रकारे मिसळून घ्यावीत. त्याने केसाला मालिश करावी. रात्रभ़र तेल तसेच ठेवावे. केसाला शॉवर कॅप किंवा टॉवेल गुंडाळावा. सकाळी उठून केस धुवावेत.

पपईचा पॅक-

त्वचेसाठी पपई खूप फायदेशीर आहेच पण केसासाठीही ती चांगली आहे. त्यासाठी पपई कापून साल काढावी. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून त्यात अर्धा कप दही मिसळावे. केसाला जिथे फाटे फुटले आहेत तिथे हा पॅक लावावा. अर्धा तासाने केस धुवावेत.

दूध आणि साय-

अर्धा कप दुधात १ चमचा साय किंवा क्रीम मिसळावे आणि ते डोक्यावर लावावे. त्यानंतर १५ मिनिटांनी केस धुवावेत.

डाळीचा पॅक-

अर्धा कप काळी उडीद डाळ वाटून त्याची पावडर करावी. त्यात १ चमता मेथी दाणा पावडर आणि १ कप दही घालावे. चांगले मिसळून घ्यावे. ही पेस्ट केसाला लावावी. दोन तासांनंतर रसायनविरहीत शॅम्पूने केस धुवावेत. दर दिवसाआड हा उपाय केल्यास फुटी जाण्यास मदत होते.

केळाचा पॅक-

केळ केसासाठी उत्तम औषध आहे. त्यामुळे केस मजबूत आणि आरोग्यदायी होतात. एक केळे कुस्करून घ्यावे. त्यात २ चमचे दही, १ चमचा गुलाबजल आणि १ चमचा लिंबाचा रस घालून ते सर्व योग्यप्रकारे एकत्र करावे. हा पॅक केसाला लावावा. १ तास तसेच राहू द्यावे मग केस धुवून टाकावे. आठवड्यातून २ वेळा असे करावे. त्यामुळे केसाला फुटी फुटण्याचे प्रमाण कमी होते.

अंड्याचा पॅक-

केसासाठी अंडे लावणे देखील उपयुक्त असते. अर्थात त्याचा वास येत असल्याने हा उपाय टाळला जातो. मात्र अनेक सौदर्यवर्धक उपायांपैकी हा प्रभावशाली उपाय आहे. एक अंडे घेऊन त्यात २ चमचे ऑलिव्ह तेल आणि १ चमचा मध टाकावे. हे सर्व चांगले मिश्र करून केसाला लावावे. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केसाचे आरोग्य उत्तम राहिल.

मधाचा पॅक-

केसाच्या आरोग्यासाठी मधही उत्तम घटक आहे. त्यासाठी चार कप पाणी पातेल्यात उकळावे. उकळत असताना पाण्यात एक चमचा मध घालावा आणि एकत्र मिसळावे. हे मिश्रण प्रत्येक वेळी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर म्हणून लावावे. त्यामुळे केसाचा कोरडेपणा दूर होईलच शिवाय फाटे फुटणार नाहीत. तसेच केस चमकदार दिसतात.

बीअर-

केस धुण्यासाठी बिअरचा वापर क़रणे चांगले मानले जाते. थोडी बिअर हातात घेऊन त्याने केसाला मसाज करावा. काही वेळाने केस धुवून टाकावे. खूप काळ ठेवल्यास केसाला बिअरचा वास येतो

मेयोनीज-

खाण्याचा हा अत्यंत प्रिय पदार्थ केसाच्या फुटींवरही उत्तम उपचार करतो. कोरडे केस आणि कोंडा या समस्या कोणाला चुकल्या नाहीत. त्यामुळे केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी अर्धा कप मेयोनिझ घेऊन टॉवेलने पुसलेल्या केसाच्या मुळाशी लावावे. २० ते ३० मिनिट तसेच ठेवावे. मग केस थंड पाण्याने धुवावेत. धुताना शॅम्पूचा वापर करावा.

अव्हाकॅडो मास्क-

अव्हाकॅडो मध्ये ए, डी आणि ई जीवनसत्त्व असते. ही तीनही जीवनसत्त्वे केसाच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहेत. प्रथिने आणि फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाणही यात भरपूर असते. त्यामुळे केसाला उत्तम पोषण मिळतेच शिवाय कंडिशqनगही होते. पिकलेले अव्हाकॅडो घेऊन ते कुस्करावे त्यात २ चमचे ऑलिव्ह तेल आणि नारळाचे तेल घालावे. हे चांगले फेटावे जेणेकरून ते पांढऱ्या शुभ्र मलईसारखे दिसते. आता ही पेस्ट केसाच्या मुळाशी लावावी. अर्धा तास केसात तशीच राहू द्यावी आणि मग केस शॅम्पूने धुवावेत.

मध आणि दही-

मधासोबत दही केसाना लावावे. एक चमचा मध आणि अर्धा कप दही एकत्र करावे. केसाच्या मुळापासून लावावे. अर्धा तासाने केस चांगल्या शॅम्पूने धुवावे.

जोजोबा तेल-

जोजोबा तेल केस धुताना शॅम्पूत मिसळून वापरल्यास केसाला फाटे फुटण्याचे प्रमाण कमी होते.

या व्यतिरिक्त काही गोष्टींची काळजी जरुर घ्यावी. नियमितपणे केसाला तेल लावून मालिश करावी. त्यामुळे त्वचेच रक्तभिसरण चांगले होण्यास मदत होते. केस चमकदार आणि मजबूत होतात. बदाम, ऑलिव्ह आणि नारळ तेल समप्रमाणात एकत्र करून त्याने केसाला मालिश करावी. तसेच केसाला ओला टॉवेल गुंडाळावा. मग अर्धा तासाने केस धुवावेत.

केसाच्या चांगल्या आरोग्यसाठी जी उत्पादने आपण निवडतो आहोत ती चांगल्या गुणवत्तेची आणि दर्जाची असावीत. शिकेकाई, रिठा आणि आवळा पावडर एकत्र करुन ते शॅम्पू ऐवजी लावावे.

केस ओले असताना विंचरू नयेत तसेच केस गुंतले असल्यास शांतपणे विंचरावेत. केस विंचरताना मुळापासून विंचरण्यास सुरुवात करावी जेणेकरून गुंता चटकन मोकळा होईल. तसेच हेअर ड्रायरचा अतिवापर करु नये.

वरील उपाय आणि सुरक्षेचे उपाय यामुळे केसाच्या फुटी फुटण्याची समस्या नक्कीच कमी होईल आणि कालांतराने बंदही होईल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon