Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

केस गळतायत? हे घरगुती सोप्पे उपाय करा

         

        आजकाल प्रदूषण ,राहणीमान, खाण्यापिण्याच्या योग्य वेळा नसणे, केसांची योग्य काळजी न घेणे, प्रवास अश्या विविध कारंणानी केसांचे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. याकरता आम्ही काही सोप्पे घरगुती उपाय सांगणार आहोत .

खोबरेल तेल नारळाचे दूध 

आठवड्यतून एकदा तरी खोबरेल तेल किंवा नारळाचे दूध लावावे त्याने केस मऊ होतात. नारळाचे दूध काढून केसांना लावावे आणि एक सुती फडक्याने केस बांधून ठेवा आणि नंतर केस सौम्य शॅम्पूने  धुवा. रात्री झोपताना तेलाने केसाला मसाज करून दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने  केस धुवावे 

२.  कांद्याचा रस

एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा. रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा त्यानंतर केस सौम्य शॅम्पूने किंवा शिकेकाई ने केस धुवा. असे आठवड्यातून एकदा तरी करावे या उपायाने केस गळणे कमी होते. 

३. लसूण 

लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या,त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या मिश्रण थोडे कोमट झाल्यावर केसांच्या मुळांशी लावून मसाज करा. आणि हे तेल एक तास केसांवर असेच ठेवा आणि नंतर केस धुवा.

४. मेहंदीची पाने आणि मोहरीचे तेल 

साधारण २५० ते ३०० ग्रॅम मोहरीचं तेल गरम करा. त्यात ६०-८० ग्रॅम (मेहंदी)ची पानं मिसळून तेल पुरेसं गरम करा. पानं चॉकलेटी रंगाची होईपर्यंत मंद आचेवर तेल गरम करा. थोड्या वेळानं गॅस बंद करून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळा.आणि हे मिश्रण हवाबंद डब्यात घालून ठेवा. दार आठवड्याला हे मिश्रण केसांच्या मुळाला लावा आणि मसाज करा. यामुळे केस गळणे कमी होईल पांढऱ्या केसांसाठी देखील हे तेल उपयुक्त ठरते.  हे तेल लावल्या नंतर एक तास ठेवा आणि नंतर केस धुवा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon