Link copied!
Sign in / Sign up
97
Shares

अति केस गळण्याची कारणे आणि उपाय

डोक्यावरची केस एकदम कमी होणे आणि केस तुटणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच त्याची कारणे, उपाय आणि लक्षणे भिन्न- भिन्न असतात. आणि ह्या दोन्ही गोष्टींना एकच आहे अशी चुकी करू नका. कारण अशा गैरसमजामुळे तुम्ही खूपच चिंताग्रस्त होतात. आणि त्या ताण-तणावाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर पडतो. ह्या ब्लॉगमध्ये स्त्रियांच्या केसांची समस्या विषयी सांगितले आहे.

१) केस गळणे आणि एकदम केस खूप तुटायला लागणे ( baldness) ह्यात काय फरक आहे

केस गळणे एक सामान्य समस्या आहे. ज्यामध्ये ज्या केसांचे जीवन-चक्र समाप्त झाले असते ती केस आपोआप डोक्यातुन गळतात. आणि ह्यामुळे तुमच्या केसांच्या वाढण्यावर काहीच परिणाम होत नसतो. ह्या जागेवर नवीन केस यायला लागतात. त्यामुळे ही घाबरण्यासारखी गोष्ट नाहीच.

टक्कल पडणे : ही समस्या एका रोगासारखी असते हळूहळू डोक्यावरची केस गळत जाऊन डोक्यावरची केस खूप कमी होऊन काही ठिकाणी टक्कल पडायला लागते. आणि केसांची घनता सुद्धा कमी होऊन केस विरळ होतात. आणि ह्याची कारण बऱ्याच अंशी तुमच्या शरीरातील हार्मोनल बदलामुळे, केमिकल्स, केसांवर वापरलेल्या केमिकल्सचा साईड इफेक्ट आणि अति-वापर, केसांवर गरम अशी साधनांचा वापर जसे की, हेयर straightner सारखी साधने ह्यामुळेही केसांवर परिणाम होत असतो.

२) कंगवा केसात फिरवताना केसांचे गळण्याचे प्रमाण

जर एखाद्या दिवशी कंगवा फिरवताना खूपच केस गळायला लागले तर असे समजू नका की तुमच्या डोक्याला आता टक्कलच पडेल. किंवा दाट केस विरळ होतील. ते कमकुवत केस असतात म्हणून ती गळतात.

जर कंगवा व शाम्पू लावताना खूप केस गळत असतील आणि त्याचे प्रमाण जर १०० (सामान्यपणे गृहीत धरू) असेल तर त्याबाबत दक्ष असा कारण अशावेळी काही दिवसांनंतर तुम्हाला अचानक डोक्याच्या एखाद्या भागावर टक्कल पडलेली दिसते. तेव्हा त्याबाबत जागरूक असा.

३) टक्कल पडण्याची / केस खूप विरळ होण्याची लक्षणे

खरं म्हणजे टक्कल कोणत्या वेळी पडते ज्यावेळी स्त्रियांच्या हेअर फॉलिकल मधून एकही नवीन केस उगवत नाही. नवीन केस उगवण्यासाठी काही अडचण येत असेल किंवा नवीन केस उगवणे बंदच होऊन जाते. आणि हे शरीरातली हार्मोन्स कमी-जास्त किंवा त्यात बदल होणे ह्यामुळे होत असते. आणि शरीरातील हार्मोन बदल प्रोटीनची मात्रा कमी होणे, अति प्रमाणात व्हिटॅमिन अ, काही वेळा जेनेटिक्स आणि गर्भ-निरोधक ह्यांचाही साईड इफेक्ट होउ शकतो.

४) टक्कल पडण्याचा कालावधी

दररोज तर थोडे केस गळतच असतात. ह्याचे चक्र ४ महिन्याचे असते. आणि त्याचवेळी केसांचे गळणे सतत ४ महिन्यापर्यंत चालूच राहिले तर ते टक्कल पडण्याला जन्म देऊ शकते.

५) टक्कल पडण्यावर काय उपाय करता येईल ?

जर तुम्ही गर्भावस्था मध्ये असाल आणि ह्यावेळी खूप केस गळत असतील तर डॉक्टरांना भेटून घ्या. कारण जर हे हार्मोनल कारणामुळे होत असेल तर डॉक्टर त्यावर औषध देतील. आणि जर हे जर कोणत्या औषधाचा परिणामाने होत असेल तर त्या औषधी बंद करता येतील.

१. आहारात पोषक व खूप पौष्टिक तत्व असलेला आहार घ्या, जसे की sprouts, ताजी फळ, बटर, सुका मेवा आणि हिरवा भाजीपालाचा समावेश करा

२. मानसिक ताण-तणावाचा खूप परिणाम केसांवरती खूप पडत असतो. त्यासाठी चिंता, काळजी आणि टेन्शन घेण्याचे थांबवा. वाटल्यास त्यासाठी तुम्हाला ज्यावेळी असा तणाव वाटत असेल तेव्हा समजून घेणाऱ्या व्यक्तीशी बोलून घ्या.

३. तुम्ही जर आनंदी आणि उत्साही राहायला लागलात तर केस आपोआप उगवायला लागतील. त्यासाठी be happy आणि be positive. हा ब्लॉग तुम्हाला उपयोगी पडला असेल तर इतरांनाही शेअर करा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon