Link copied!
Sign in / Sign up
37
Shares

तुमचे केस गळत असतील तर हे जालीम घरगुती उपाय करा


            आजच्या काळात बहुतांश महिला आणि पुरुष केसगळतीमुळे त्रस्त आहेत. अनेकांची त्यामुळे झोप उडाली आहे. केसांसाठी घातक केमिकल्स असलेल्या प्रोडक्टसचा वापर तसेच आहारातील प्रोटिन्सचे घटलेले प्रमाण अशी केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. पण काळजी करण्याची गरज नाही. केस कोणत्याही कारणांमुळे गळत असतील, तेव्हा tinystep मराठी घेऊन येत आहे, काही घरगुती उपायांमुळे तुम्ही त्यावर मात करु शकता.

१) अर्गन ऑईल वापरा

 केसांमध्ये प्रटिन हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. त्याला केराटिन असंही म्हणतात. ज्यामुळे केसांना आकार, लवचिकपणा आणि ताकद मिळते. एका संशोधनानुसार अर्गन ऑईल केसांतील प्रोटिनचे कमी होणारे प्रमाण थांबवून केस गळण्यापासून थांबवते. या तेलाने

तुमच्या स्काल्पवर (टाळू) मसाज हळूवारपणे मसाज करा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि केसांची मूळं मजबूत होतात. यामुळे तणावही कमी होतो.

२) कुप्पासू सीड बटरने कंडीशननिंग करा

 कुप्पासू सीड बटर हे अमेझॉनच्या जंगलात सापडणाऱ्या थेओब्रोमा ग्रॅण्डीफ्लोरमपासून बनवलं जातं. ते स्टेअरिक, पाल्मिटिक, ओलेक आणि आर्चिऑडिक असिड अशा फॅटी असिडने समृद्ध असतं. ते तुमचे केस मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच कसांमधील प्रोटिनचे घटते प्रमाण थांबवण्याचे कामही ते करतं. त्यामुळे कसांचे नुकसान आणि केस गळती थांबते.

3) केसांची नारळ तेलाने मसाज करा

नारळाच्या तेलातील लॉरिक असिडमुळे केस मजबूत होण्यास मदत होते व त्यामुळे केसगळती होत नाही. तसेच त्यामुळे केसांमधील प्रोटिनचे प्रमाणही कमी होत नाही. तसेच सुर्याच्या अतिनील किरणांपासून ते केसांचे रक्षणही करते. रसायने तसेच कडक ऊन्हामुळे केसांची होणारी थांबवण्यासही खोबरेल तेल उपयुक्त ठरते.

४) मेथी

मेथी केस गळतीच्या उपचारांसाठी मेथीही अतिशय चांगली असती. एक कप मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी भिजलेली मेथी वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि शॉवर कॅप लावा. 40 मिनिटांनी केस धुवून टाका. महिन्यातून एकदा हा उपाय करा, तुम्हाला परिणाम दिसेल.

५) बनाना मास्क

केळीमध्ये प्रोटिन, फॅट आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. जे केस गळती थांबवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एक केळ्यात लिंबूचा रस मिक्स करून ते एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा. 15 मिनिटांपर्यंत ही पेस्ट डोक्याला असू द्या. त्यानंतर केस धुवा. केस गळण्याची समस्या दूर होई

६)  केस गळती थांबवण्यासाठी आवळा तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा कॅस्टर आईल तुम्ही केसांना लावू शकता. याशिवाय रोजमेरी इसेंशिअल ऑईलचे काही थेंब बेस ऑईलमध्ये मिक्स करुन लावल्याण परिणाम जाणवेल. आठवड्यातून किमान एक वेळा हेअर ऑईलने मसाज करा. त्यामुळेही केस गळती थांबते.

७) केसांना डॅमेज करणाऱ्या ट्रिटमेंट टाळा

डॅमेज झालेले केस सहजपणे गळतात. त्यामुळे केसांना कमजोर बनवणारे हेअर स्टेटनिंग, हेअर कर्लिंग, ब्लो ड्रायर्स ह्या पद्धती शक्यतो टाळा. तसेच जास्त उन्हामुळेही तुमच्या केसांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे डोक्यावरील ऊन कमी करण्यासाठी काळजी घ्या.

 

८)  ओले केस बांधू नका

कोरड्या केसांपेक्षा ओले केस जास्त लवचिक असतात. त्यामुळे खूप सहजपणे ते तुटतात. त्यामुळे ओल्या केसांना ब्रेश करताना, बांधताना किंवा टॉवेलने पुसतानाही हे केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला हेअर स्टेटनिंग करायची असेल, तर त्यांना कोरडे होऊ द्या. त्यानंतर दातांमध्ये जास्त अंतर असलेल्या कंगव्याने केस विंचरा

 

९) केसांना वारंवार ब्रश करू नका

 

झोपण्यापुर्वी केसांना शंभऱ वेळा ब्रश केल्यास तुमचे केस चमकदार आणि तकतकित राहतील. हे आपण अनेक वेळा ऐकलं असेलं. पण हे खरं नाही. तुमचे केस चमकदार होण्याऐवजी उलट तुमचे केस डॅमेज होण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल, तेव्हाच भांग काढा. तसेच त्यासाठी दातांमध्ये जास्त अंतर असलेला कंगवाच वापरा.

 

१०) केस घट्टपणे बांधू नका

 वेगवेगळ्या हेअरस्टाईल्समध्ये केस घट्टपणे बांधले जातात. पण केस घट्टपणे बांधल्यामुळे ते तुटण्याचा धोका वाटतो. त्यामुळे कधीही घट्टपणे केस बांधू नका.

शेअर करून अनेकांना ह्या लेखाचा/ ब्लॉगचा उपयोग होऊ द्या. 

 

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon