Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

केमिकल प्रेग्नेन्सी(रासायनिक गर्भधारणा) म्हणजे काय ?(मराठीतून)


केमिकल गर्भधारणा म्हणजे जेंव्हा एखाद्या स्त्रीची प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझीटीव्ह दिसते परंतु त्या स्त्रीच्या गर्भाशयात अल्ट्रासाऊंडद्वारे काही दिसण्याआधीच तेथे गर्भपात होतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर केमिकल प्रेग्नेन्सी म्हणजे वेळेच्या आधी, अर्थात खूप लवकर गर्भपात (मिसकॅरेज) होणे. यास रासायनिक किंवा केमिकल गर्भधारणा असे म्हणतात कारण गर्भपात होण्यापूर्वी ती स्त्री गरोदर होती याचा एकच रासायनिक पुरावा प्रेग्नेन्सी टेस्ट द्वारे उपलब्ध असतो. यात अंडे गर्भाशयात फलित होते परंतु काही कारणांमुळे त्याची वाढ होऊ शकत नाही.

प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर एका आठवड्याने मासिक पाळी येणे ही गोष्ट गोंधळात टाकणारी आणि भीतीदायक असू शकते परंतु ही एक सामान्य घटना आहे. ५०-७५% गर्भपातांचे कारण केमिकल प्रेग्नेन्सीच असते. बीज रुजल्यानंतर एक- दोन आठवड्यांच्या आत होणारा गर्भपात हा केमिकल प्रेग्नेन्सी म्हणवला जातो. इतर गर्भपात गर्भधारणेनंतर २० आठवड्यांपूर्वी होतात.

१) चिन्हे आणि लक्षणे

सर्वाधिक केसेस मध्ये स्त्रियांना या केमिकल प्रेग्नेन्सीची लक्षणे दिसत नाहीत. अनेक जणींना गर्भधारणा झाली होती हेच कळलेले नसते. पण काही स्त्रियांनी मासिक पाळी सुरु होण्याच्या १ आठवड्याआधी कमी तीव्रतेच्या कळा आणि ठिपक्यांच्या स्वरुपात थोडा रक्तस्त्राव झाल्याचे नोंदविले आहे. प्रेग्नेन्सी हार्मोन hCG ची कमतरता असल्यामुळे मळमळणे, कोरड्या उलट्या ही लक्षणे त्यांच्यात दिसली नाहीत. कमी असलेली hCG संप्रेरकांची पातळी रक्त तपासणीद्वारे लक्षात येऊ शकते.

२) केमिकल प्रेग्नेन्सी ची कारणे

केमिकल प्रेग्नेन्सीची अनेक कारणे असू शकतात. यात गर्भाशयाच्या आतील पडदा पातळ असणे, संप्रेरकांची कमतरता, इन्फेक्शन होणे, ल्युटल फेज डीफेक्ट- म्हणजे अंडाशयातून पुरेसे प्रोजेस्टेरोन नावाचे संप्रेरक न सोडले जाणे, किंवा इतर अजून काही कारणे यामागे असू शकतात. असे असले तरी अनेक शास्त्रज्ञांचे असे मत आहे की इतर गर्भपातांमागे जे कारण असते तेच केमिकल प्रेग्नेन्सीचे असते, जसे की बाळाच्या वाढीसाठी प्रतिकूल असणारी गुणसूत्रे असामान्य (अती जास्त किंवा कमी) असतात. या गुणसूत्रांच्या असामान्यतेचे कारण शुक्राणु किंवा अंडे कमी दर्जाचे असणे, पेशींचे असामान्य विभाजन, किंवा दोन्हीपैकी एका पालकाकडून जनुकीय असामान्यत्व (अब्नोर्मलिटी) येणे. 

२.१) तज्ञांच्या मते, अर्ध्या केमिकल प्रेग्नेन्सीचे कारण गुणसूत्रांत असते. काही इतर कारणांमध्ये इन्फेक्शन (सिफिलीस, क्लॅमिडिया किंवा टोक्झोप्लासमोसीस), आजारपण ( उपचार न केलेला थायराॅईड), गर्भाशयातील दोष (आधीपासून किंवा नंतर उद्भवलेला) किंवा अंड्याचे गर्भाशयाबाहेर रुजणे.

३) काळजी आणि उपचार

दुर्दैवाने, केमिकल प्रेग्नेन्सी थांबवता येत नाही आणि यास काही विशेष असे उपचार देखील नाहीत. परंतु यात एक चांगली गोष्ट म्हणजे केमिकल प्रेग्नेन्सी मुळे भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होत असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. ज्या स्त्रियांना आधी केमिकल प्रेग्नेन्सीचा अनुभव आहे त्यांनी सुधृढ बालकांना जन्म दिला आहे. तरीही काही स्त्रियांच्या बाबतीत खास करून अशा स्त्रिया ज्यांना मूल होण्यात अडचणी असतात त्यांना गर्भपाताच्या मानसिक परिणामांना तोंड द्यावे लागते. इथे त्यांच्या मानसिक स्थितीची काळजी घेणे गरजेचे ठरते. 

३.१) ज्या जोडप्यांना केमिकल प्रेग्नेन्सीचा अनुभव येत आहे त्यांनी डॉक्टरांना भेटून यावर योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. यात अॅन्टीबायोटिक्स (इन्फेक्शनसाठी), प्रोजेस्टेरोनचे डोस, गर्भाशयातील आतील पडद्याच्या पातळ असण्यावर शस्त्रक्रिया करणे, बेबी अस्प्रीन – इत्यादी उपचारांचा समावेश होतो. केमिकल प्रेग्नेन्सी नंतर पुन्हा बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना कमीत कमी एका मासिक पाळीच्या चक्रासाठी थांबण्याचा सल्ला देण्यात येतो.        

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon