Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

केळीच्या ह्या घरगुती उपायांनी तुमचे सौदर्य खुलवा

      केळी सर्वानाच माहित आहे आणि ती किती पौष्टिक आहे. हेही माहिती आहे. पण केळीचा उपयोग हा तुमचे सौदर्य खुलवण्यासाठी होतो. ह्या विषयी तुम्हाला माहिती नसेलच पण हे खरे आहे. तेव्हा त्याविषयी जाणून घेऊ. आपल्याकडे केळी वर्षभर मिळते आणि ती स्वस्तसुद्धा आहे. तेव्हा केळीची मदत तुम्हाला कशी होईल ते जाणून घेऊ.

        १) कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्यावर सर्वात सोप्पा उपाय म्हणजे केळ्यांचे मिश्रण वापरणे. दोन लहान केळ्यांची पेस्ट करुन त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि तीन मोठे चमचे मेयोनेज टाकून त्याचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण हेअरडाय लावतो तसे केसांवर चांगल्या प्रकारे लावा. अर्धा तासानंतर हे चांगल्या प्रकारे धुवून घ्यावे. यामुळे कोरड्या आणि निर्जीव केसांना नवीन लकाकी मिळेल.

२) दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळाचे पिवळे साल गुणकारी आहे. केळीचे साल दोन मिनिटांसाठी दातांवर घासले तर पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.

३) घरात काम करताना एखाद्या गरम गोष्टीला स्पर्श झाल्याने लहान-मोठा चटका लागल्यास त्यावर केळीची साल लावावी. त्यामुळे चटका लागल्यावर होणारी जळजळ थांबते आणि त्या भागाला आराम मिळतो. तसेच त्या चटक्यामुळे शरीरावर पडणारा डाग लवकर निघून जातो. आयुर्वेदामध्येही याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

४) ह्या हिवाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे कोरडी त्वचा. अनेकदा पेट्रोलियम जेलीचा वापर करुन कोरड्या त्वचेच्या समस्येवर उपाय शोधला जातो. मात्र, कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असाल तर घरच्या घरी केळ्याचा फेस पॅक बनवून त्याचा वापर केल्यास त्वचा तजेलदार होते. हा घरगुती फेसपॅक बनवण्यासाठी गरजेप्रमाणे केळी कुसकरुन त्यामध्ये दोन मोठे चमचे मध टाकून मिक्स करुन घ्या. आता हे फेसपॅक १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावून धुवून टाका. त्वचा टवटवीत तर होतेच शिवाय त्वचेवर एक प्रकारचा तजेलदारपणा दिसून येतो.

५) हिवाळ्यातील आणखीन एक समस्या म्हणजे टाचांना पडणाऱ्या भेगा. या भेगांवर मलम लावून उपचार करण्याऐवजी केळ्यांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने यावर उपचार घरच्याघरी करता येईल. केळी, मध आणि लिंबूचे मिश्रण पायाच्या भेगा भरण्यासाठी उपयुक्त असते. पिकलेल्या केळी कुस्करून दोन तीन चमचे मध आणि लिंबाचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्या आणि ते भेगा पडलेल्या टाचांवर लावून ठेवा. एका तासानंतर पाय कोमट पाण्याने धुवून घ्या. दिवसाआड पायांना हे असे मिश्रण लावल्यास टाचाच्या भेगा भरून येण्यास मदत होईल.

साभार - लोकसत्ता 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon