Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

कावीळ झाल्यावर काय करावे आणि काय नाही.....बघून घ्या..नाही करायच्या गोष्टी कराल


कावीळ ह्याविषयी काही व्यक्तींमध्ये खूपच भीती असते कारण ह्यात खूप पथ्ये आणि हे खाऊ नये म्हणून सुद्धा. या सांसर्गिक आजारावर अनेक प्रकारचे उपाय आहेत. सगळयांत सोपा उपाय म्हणजे भुईंआवळा. ही पावसाळयात वाढणारी एक वनस्पती असते. १२ तर १५ इंचाचे हे पूर्ण रोप (मुळासकट) कुटून त्याचा रस करावा.

यासाठी त्यात थोडे पाणी मिसळावे लागते. हे दोन-तीन चमचे याप्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा द्यावा. असे कावीळ बरी होईपर्यंत रोज द्यावे. ही वनस्पती वाळवून चूर्ण करून ठेवून गरज पडल्यावर पाणी मिसळून वापरता येते. पण यात ओल्या वनस्पतीपेक्षा कमी गुणवत्ता असते.

१) काविळीत लघवीचा रंग लालसर असल्यास एरंडाच्या १ ते २ पानांचा देठासह रस द्यावा. हा रस सकाळी रिकाम्या पोटी ४ ते ५ दिवस रोज द्यावा.

२) जेव्हा लघवीचा रंग पिवळा पण विष्ठा पांढरट असेल तेव्हा पित्तरसाचा आतडयात येण्याचा मार्ग बंद झालेला असतो. अशावेळी सैंधवमीठ २ ग्रॅम व त्रिकटू चूर्ण २ ग्रॅम ३ दिवसांपर्यंत देत राहावे. या उपायाने सुजेचा अडथळा दूर होऊन पित्ताचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र गाठ, खडा यांमुळे अडथळा असेल तर पित्तमार्गावर शस्त्रक्रियाच करावी लागेल.

३) आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काविळीत तेलकट, पचावयास जड असलेले पदार्थ व मिठाई हे वर्ज्य आहेत. मात्र अल्प प्रमाणात गाईचे तूप (१० ते २० मि.ली.) हे पित्त कमी करते म्हणून देत राहावे.

४) आयुर्वेद काविळीच्या उपचारात, तेल व तूप यांना सारखे मानत नाही. तेल, डालडा, वनस्पती तूप हे पित्तकारक तर साजूक तूप हे पित्तशामक आहे.

जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी १५ ते २० मि.ली. तूप देऊन तिस-या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/ अमलताश) मगज १५-२० ग्रॅम पाण्याबरोबर द्यावा. आरग्वध मगज यामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.

५) काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत.

लाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी तसेच पालक-टोमॅटो-दुधी-कोबीचं कोमठ सूप, भाताची पेज, मध्यम पिकलेल्या केळी यासारखे पदार्थ द्यावेत. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खावा. गोड आणि ताजे ताक दिवसातून किमान दोन वेळा प्यावं. गूळ पाण्यात उकळून गाळून त्याचा काढाही दिवसातून एकदा घ्यावा.

कावीळ झालेल्या रुग्णांनी काय करू नये.

काविळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणं गरजेचं असतं. सुमारे महिनाभर पूर्ण आराम करावा, मात्र जास्त झोपू नये.

उन्हात फिरणं टाळावं. काविळ झालेल्या व्यक्तीनं काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत.

बाहेरचे अन्न खाऊच नये. दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा.

पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत.

पाणी उकळून थंड करूनच प्यावं.

स्रोत - संकलन 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon