Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

बॉलिवूडची करिना कपूर इतकी सडपातळ का आहे ?

          बाळाच्या जन्मानंतर जवळपास प्रत्येक चाहतीने करिनाला तिच्या प्रेग्नन्सी डाएट विषयी प्रश्न विचारले. अखेरीस तिने या प्रश्नावरचे मौन सोडले असून तिच्या आहाराची सविस्तर माहिती दिली. भारतातील सध्या आघाडीची आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी तिच्या आहारासाठी मार्गदर्शन केले असून त्याची विस्तृत माहिती पुढे दिली आहे.

१) सर्व भाज्यांचा आहारात समावेश

सर्वांत महत्वाची बाब म्हणून तिने नमूद केलेली एक गोष्ट म्हणजे आहारात सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, वेल भाज्यांचा समावेश केला. सर्व प्रकारच्या भाज्यांमधूनच तुमचे योग्य पोषण होते, म्हणूनच त्यांचे फक्त पृथ्वीवरच अस्तित्व आहे. जेव्हा तुम्ही सर्व भाज्या खाता तेव्हाच तुमचे बाळ मोठे होताना सरभाज्या खाईल.

२) पहिल्या काही महिन्यातील अशक्तपणा टाळण्यासाठी

आज गर्भवती असलेल्या सर्व स्त्रियांना करिनाचा आवर्जून संदेश आहे तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी चहा-कॉफी घेणे टाळा. त्याऐवजी qलबू पाणी काळे मीठ घालुन, ताकात थोडे qहग घालून असे प्यायल्यास अशक्तपणा कमी होतो. प्रत्येक ऋतुमध्ये उपलब्ध असणारी फळे जसे की स्ट्रॉबेरी, चेरी, आंबे, कqलगड, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे भरपूर प्रमाणात खा.

     ३) सकाळचा नाश्ता भरपेट करा

दिवसभरातील सर्वांत महत्वाचा आहार म्हणजे नाश्ता असतो. दिवसभर लागणारी उर्जा आणि ती मिळविण्याची सुरवात नाश्त्यापासून होते. यामधून शरीराला आवश्यक उर्जा देणारे पदार्थच खाल्ले पाहिजेत.थोडक्यात पूर्ण नाश्ता आवश्यक असल्याचे करिना म्हणते. त्यानंतर दुपारच्या जेवणातून उर्वरित पोषकतत्वे मिळवायची असतात.

४) लवकर निजे, लवकर उठे

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात झोप ही अत्यंत गरजेची आहे. कधी काही कारणांनी आपली झोप पूर्ण होतेच असे नाही तेव्हा शरीरही थकलेले असते. अर्धवट झोपेमुळे आपले शरीर सक्रिय असल्याचे केवळ दाखवते पण त्याचे दुष्परिणाम मात्र इतर अवयवांवर होतात. त्यामुळे गर्भवतींनी देखील लवकर झोपून सकाळी लवकर उठल्यास फायदेशीर ठरते. एका संशोधनानुसार हे सिध्द झाले आहे की, सकाळी लवकर उठून काम करणाऱ्या व्यक्तींची कठीण परिश्रम करण्याची आणि उत्पादन क्षमताही जास्त असते. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon