Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

ह्या गोष्टीमुळे कारले खायला हवेच

कारले खूप कमी व्यक्ती खात असतील पण चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती खूप चांगली विकसित होत असते. कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार आहेत. 

कारले कसे खावे 

* कारले घ्यावे त्याचा पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताक मध्ये घेऊन रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कायमचा चालला जातो. जर तुम्हाला कारल्याची मुळे मिळाली तर स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.

* खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर िलबूरस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.

 * मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्यांचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५-५ ग्रॅम (अर्धा

चमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.

*  जंत-कृमी झाले असतील तर कारल्यांच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.

* कुणाला दारूचे व्यसन असेल तर, दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ-संध्याकाळ कपभर घ्यावा.

* दमा, सर्दी, खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे विकार दूर होतात.

*  यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो.

*  कारल्याच्या पानांचा कल्क, हळद, तीळ तेलात उकळून हे तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायासीस हा विकार दूर होतो.

* स्त्रियांमध्ये बीजांडकोषाला सूज आल्यास कारले बी, मेथी, गुळवेल, जांभूळ बी यांचे चूर्ण करून प्रत्येकी पाच ग्रॅम (अर्धा चमचा )सकाळ-संध्याकाळ घ्यावे.

* लघवीस त्रास होत असेल तर कारल्यांच्या पानांचा १ कपभर रस चिमूटभर हिंग घालून प्यावा.

* जुनाट ताप (जीर्णज्वर) झालेला असेल तर अशा वेळी कारल्याची पाने वाटून त्याचा रस काढावा व हा रस सकाळी व संध्याकाळी पिण्यास द्यावा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon