Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

कपाळावरील सुरकुत्या कमी करण्याचे ६ खात्रीशीर उपाय.


कपाळावर असणाऱ्या सुरकुत्या बघताच कोणालाही आपल्या तारुण्यात जावेसे वाटेल. वयानुसार त्वचेत बदल होणे साहजिक आहे. तुम्ही तुमच्या पासपोर्टवरील तुमचे वय जरी कमी करू शकत नसाल तरी कपाळावरील सुरकुत्या मात्र नक्कीच कमी करू शकता. तुमच्या पासपोर्टवरील तुमचे वय तुमच्या चेहेऱ्यावर दिसू नये असे आम्हालाही वाटते. या सुरकुत्या कमी करण्यासाठी काही खात्रीशीर उपाय आम्ही इथे दिले आहेत. तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी या टिप्स जरूर वापरा.

१. रेटीन – अ .

सौंदर्यशास्त्रातील प्रगतीने चेहेर्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी रेटीनोइड्स हे एक वरदान ठरले आहे. रेटीन – अ हे एक त्वचेवर वरतून लावायचे क्रीम आहे. या क्रीम मध्ये रेटीनोइड्स असतात जे त्वचेखाली कोलेजनचे प्रमाण वाढवतात यामुळे त्वचा मुलायम राहते. या क्रीममुळे तुमची त्वचा नक्कीच नितळ होईल आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर क्रीम्सपेक्षा हे क्रीम जास्त परिणामकारक आहे.

२. फेशियल एक्सरसाईझ.

तुम्हाला तुमचे वय कमी करायचे आहे का ? तर ह्यासाठी चेहेर्याचे व्यायाम करा, यामुळे तुमच्या सुरकुत्या कमी तर होतीलच पण सोबतच भविष्यात सुरकुत्या येणारही नाहीत आणि तुमची त्वचा नितळ आणि तरुण दिसेल.

बोटाने तुमच्या भुवयांच्या वरच्या बाजूस मध्यभागी अलगद दाब देऊन वर ओढा. धनुष्याच्या आकारात तुमच्या भुवया १० सेकंद धरून ठेवा. हा व्यायाम दिवसातून १० वेळा करा. याशिवाय अजून एक व्यायामप्रकार परिणामकारक आहे ज्यामुळे कपाळावरील सुरकुत्या कमी होतील, दोन्ही हाताची ४ बोटे भुवयांच्या वरच्या बाजूस ठेवून ते वरती तुमच्या हेअरलाईन पर्यंत ओढा. रिझल्ट्स दिसण्यासाठी हा व्यायाम दिवसातून २० वेळा करा.

३. सनस्क्रीन.

सूर्यप्रकाशाशी जास्तवेळ संपर्क आल्यास त्वचेतील इलास्टीन फाइबर कमी होऊन त्वचा सैल पडते. तुम्हाला तुमच्या चेहेर्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर घराबाहेर पडतांना नेहेमी सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन म्हणून तुम्हाला UVA आणि UVB प्रोटेक्शन देणारे आणि SPF जास्त असणारे सनस्क्रीन घ्या. SPF जितके जास्त असेल तितक्या वेळ ते तुमच्या त्वचेचे उन्हापासून संरक्षण करेल. सनस्क्रीन वापरण्याचे फायदे अनेक आहेत, सनस्क्रीन वापरायला सुरवात केल्यास तुम्हाला सुरकुत्यांची काळजी करण्याची गरज नाही.

४. फेशियल मसाज.

जर तुमच्या कपाळावरील सुरकुत्यांसाठी तुम्ही एखाद्या नैसर्गिक उपायाच्या शोधात असाल तर चेहेऱ्याला दररोज मसाज करणे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. नारळाचे तेल किंवा एक्स्ट्रा वर्जिन ओलिव्ह ओईलचा वापर करून तुम्ही गोलाकार दिशेने चेहऱ्यावर गाल, हनुवटी, कपाळ आणि मानेला ५ ते १० मिनिटे मसाज करा. या तेलांमध्ये असणारे अॅन्टी आॅक्सिडेंट्स त्वचेवरील वयोमानानुसार येणारी चिन्हे पुढे ढकलण्यास मदत करते. मसाज करणे हा एक सोप्पा आणि स्वस्त असा उपाय आहे. कपाळावर मसाज केल्याने डोकेदुखी सारख्या समस्या देखील नाहीश्या होतील.

५. वंडर पॅक.

कोरफड आणि अंडे या दोघांचे मिश्रण चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी खात्रीशीर उपाय आहे. एक चमचा ताजा कोरफडीचा गर आणि १ चमचा अंड्यातील पांढरा भाग एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. याने कपाळावरील सुरकुत्या काहीशा कमी होतील. अंड्यातील पांढऱ्या भागात त्वचेची एलेस्टिसिटी टिकवून ठेवण्यासाठीचे गुण असतात. आणि कोरफड त्वचेचा ओलावा कायम ठेवते. एका आठवड्याच्या वापरण्यातच तुम्हाला या पॅकचे रिझल्ट्स दिसायला लागतील.

या सर्व उपायांचा वापर नक्की करून पहा. वाढत्या वयात सुंदर दिसणे तुमचा हक्कच आहे! तुमची त्वचा नितळ आणि तजेलदार दिसावी असेच आम्हाला वाटते.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon