Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

कांजिण्यांच्या लसीकरणाबाबत माहिती असाव्यात अश्या गोष्टी!

जवळपास प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी कांजिण्यांनी ग्रस्त होण्याचा अनुभव घेतला असेलच! वॅरिसेला-झोस्टर विषाणू (VZV)ने होणाऱ्या या जंतुसंसर्गाची परिणिती लाल फोडांमध्ये होते. हे फोड आत्यंतिक खाज निर्माण करणारे आणि त्रासदायक असतात. हा अत्यंत सांसर्गिक असा जंतुसंसर्ग असून, हा प्रौढांपेक्षा शिशूंमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

परिणामी, व्यक्तींचे विशेषतः बालकांचे कांजिण्यांसाठी लसीकरण करणे आवश्यक ठरते. या संदर्भात 'चिकनपॉक्स वॅक्सिन' चा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. नावाप्रमाणेच, 'चिकनपॉक्स (वॅरिसेला) वॅक्सिन' ही शिशूंना व प्रौढांना कांजिण्यांपासून संरक्षित करण्यासाठी प्रभावी अशी लस आहे. विशेषतः ही लस अर्भकांसाठी व बालकांसाठी मूल्यवान आहे, कारण या वयात त्यांची प्रतिकारशक्ती कमजोर असते; आणि म्हणूनच, कांजिण्यांचा त्यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

चिकनपॉक्स वॅक्सिन (वॅरिसेला वॅक्सिन) ही वॅरिसेला विषाणूच्या 'अटेन्यूएटेड लाईव्ह स्ट्रेन्स' पासून बनवली जाते. अटेन्यूएशन हे विषाणूच्या संसर्ग पसरवण्याच्या क्षमतेला मोठया प्रमाणात कमी करते. शरीराची संसर्गाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवणे हे या व्हायरल स्ट्रेन वापरण्याचा उद्देश आहे. जेव्हा ही लस शरीरात टोचली जाते, तेव्हा ती प्रतिकार प्रणालीला विषाणूंविरुद्ध प्रतिद्रव्ये निर्माण करण्यास प्रेरित करते. ही प्रतिद्रव्ये वॅरिसेला-झोस्टर विषाणूंविरुद्ध मजबूत प्रतिकार आणि संरक्षण पुरवण्यात मोलाची भूमिका बजावतात.

सामान्यतः १३ वर्षे वयाखालील सर्व बालकांनी, जरी त्यांना कांजिण्यांचा संसर्ग झालेला असो वा नसो, लस टोचून घेतली पाहिजे. याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध शिबीरे आणि शासन अनुदानित कार्यक्रम घेण्यात येतात. या लसीचा डोस शिशुंच्या (किंवा बालकांच्या) वयानुरूप बदलत जातो. अमेरिकेमध्ये कांजिण्यांविरुद्ध सुरक्षित आणि परवाना असलेल्या २ लसी उपलब्ध आहेत. त्या म्हणजे -

सिंगल अँटिजेन वॅरिसेला वॅक्सिन (वॅरिवॅक्स)

कॉम्बिनेशन वॅक्सिन जी गोवर, गालगुंड, रुबेला आणि वॅरिसेला याविरुद्ध प्रभावी ठरते (प्रोक्वॉड)

i) १२ महिने ते १२ वर्षापर्यंतची बालके -

या वयोगटातील बालके ही वरील दोन्ही प्रकारच्या लस घेऊ शकतात. यांच्यासाठी २ डोस देण्याचा सल्ला दिला जातो. तरीही रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र (CDC) च्या अनुसार, या दोन्ही लसींचा पहिला डोस वेगवेगळा देणे लाभदायक आहे.

वॅरिवॅक्स चा पहिला डोस (~ ०.५ मिली) हा शिशू १२ ते १५ महिने वयाचे असताना दिला जातो. पुढचा डोस (बूस्टर - ०.५ मिली ) हा बालक ४-६ वर्षे वय असताना कधीही दिला तरी चालतो. CDC च्या म्हणण्यानुसार, सिंगल अँटिजेन वॅरिसेला वॅक्सिन च्या पहिल्या व दुसऱ्या डोस मध्ये किमान ३ महिन्यांचे अंतर ठेवले पाहिजे.

ii) १३ वर्षे वयानंतरची बालके व प्रौढ -

यांसाठी सिंगल अँटिजेन वॅरिसेला वॅक्सिन चा डोस हा १२ वर्षांखालील बालकांना निर्धारित केलेल्या डोसा एवढाच असतो. या वॅरिसेला वॅक्सिनच्या (प्रत्येकी ५ मिली) दोन्ही डोस मध्ये किमान ४ ते ८ आठवड्यांचा कालावधी ठेवावा.

सिंगल अँटिजेन वॅरिसेला वॅक्सिनचे पुष्कळ फायदे आहेत. तसेच, या लसीचे दुष्परिणाम क्वचितच आढळून येतात. तथापि, काही बालके आणि प्रौढांमध्ये सौम्य वेदना आणि ताप येऊ शकतो. काही वेळेस इंजेक्शन दिल्यानंतर सूज किंवा सौम्य पुरळ येऊ शकते. अशी लक्षणे ही सामान्यतः एक-दोन दिवसात नाहीशी होतात.

सगळ्या व्यक्ती सिंगल अँटिजेन वॅरिसेला वॅक्सिन घेण्यासाठी योग्य आहेत का?

खालील परिस्थिती व आजार असलेल्या व्यक्ती या वॅरिसेला वॅक्सिनची लस घेऊ शकत नाहीत :

- ल्युकेमिया, रक्त शस्त्रक्रिया वा कर्करोगावर उपचार घेणाऱ्या व्यक्ती (केमोथेरपी आणि रेडीएशन चा उपचार घेणारे सुद्धा)

- ज्यांनी अलीकडेच रक्त संक्रमण केले आहे (लसीकरणाच्या अगोदर ५ महिन्यांच्या आत)

- जर व्यक्तीला नियोमायसीन ची ऍलर्जी असेल वा लसीच्या पहिल्या डोसा मुळे ऍलर्जी निर्माण झाली असेल

- गरोदर महिलांनी त्यांच्या बाळंतपणात गंभीर समस्या टाळण्यासाठी हि लस घेऊ नये.

- ज्या व्यक्तींच्या रोगप्रतिकार शक्तींमध्ये बिघाड असेल, तसेच जे स्टेरॉईड्स (व संबंधित औषधे) वापरत असतील; त्यांनी ही लस घेणे टाळले पाहिजे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon