Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

कांद्याच्या सेवनाने होणारे हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का?


 कांदा वापरल्यामुळे पदार्थाला लज्जत तर येतेच पण त्याचबरोबर आरोग्यविषयक फायदे देखील होतात. .विशेषतः लाल कांदा व पांढरा कांदा याचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतॊ. कांद्याच्या सेवनाने पुढील आरोग्य विषयक फायदे होतात. पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी कांद्याचे सेवन विशेषतः करण्यात येते.

१. वंधत्व आणि कामेच्छा यावर गुणकारी 

कांदा कामेच्छा जागृत करण्यासाठी खूप सहाय्यक ठरते. यासाठी पातीचा कांदा विशेष उपयुक्त ठरतो. आहार तज्ज्ञांच्या मते, लैंगिक दुर्बलता दूर ठेवण्यासाठीही कांदा गरजेचा ठरतो. वंध्यत्व आणि इतर लैंगिक समस्येवर नियमितपणे कांदा सेवन केल्याने फायदा होतो.

२. लघवी विषयक समस्यांवर फायदेशीर

लघवी कमी होत असेल तसेच लघवी होताना जळजळ होत असेल तर एक कांदा अर्धा लिटर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्यावे. यामुळे लघवीची जळजळ थांबून लघवी साफ होते.

३. उन्हाचा त्रास होत नाही

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कांद्याचा वापर आहारामध्ये जास्त प्रमाणात करावा. या दिवसांत कच्चा कांदा खाणे हे अधिक लाभदायक असते.

४. त्रिदोषांवर उपयुक्त

कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे.

५. अन्नप्रक्रियेस मदत

कांद्याचे ताजे लोणचे बनवून खाल्याने तोंडास रुची उत्पन्न होते, अन्नाचे योग्यरीत्या पचन होते. 

 ६. हदयरोग आणि संबंधित आजारांवर उपयुक्त

अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.

७. अपचन,उलटी संबधित समस्या

जुलाब, उलटी, मळमळ, अपचन अशा विकारांमध्ये कांदा व पुदिना समप्रमाणात घेऊन त्याचा रस तयार करून त्यात थोडे सैंधव मीठ घालावे व ते मिश्रण प्यावे.फरक पडतो 

८. सर्दी-खोकल्यावर औषध म्हणून उपयुक्त  

 दमा, सर्दी, खोकला हे आजार वाढल्यास तसेच छातीमध्ये कफ वाढल्यास कांदय़ाचा रस, मध व आले यांचे चाटण दिवसातून २-३ वेळा घ्यावे.

९. सौंदर्यवर्धक 

 चेहरा कांतीयुक्त, सतेज दिसण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी दोन चमचे कांद्याचा रस, दोन चमचे काकडीचा रस व एक चमचा मध यांचे मिश्रण करून ते चेहऱ्यास लावावे. नियमित हे मिश्रण चेहऱ्यास लावल्यास सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचा सुंदर होण्यासाठी तिळाच्या तेलात कांद्याचा रस घालून उकळून ते तेल नियमितपणे अंघोळीपूर्वी १० मिनिटे त्वचेवर लावावे.

१०. झोप येत नसल्यास गुणकारी 

कांद्या ठेचून तो पाण्यात उकळवून काढा करावा व हा काढा दोन चमचे घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मध घालावा व हे मिश्रण रात्री झोपताना प्यायल्यास चांगली झोप लागते.

कांद्याचा औषधी म्हणून उपयोग करताना त्याचा रस काढून तो हवाबंद बाटलीत ठेवावा व उन्हातून आल्यानंतर किंवा मधुमेहामुळे तळहात व पायांची आग होत असेल तर तो रस लावावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन आग कमी होते.

 मात्र कांदा कापला कीं  लगेच त्याचा वापर होणे आवश्यक असते.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना  एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon