Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

कंबर दुखीवर आयुर्वेदिक व घरगुती उपाय

         साधारणतः खूप व्यक्तींना कंबर दुखीचा त्रास असतो. आणि हाही प्रश्न त्यांना पडतो की, नेमकी कंबर कोणत्या कारणांनी दुखत आहे. तर बऱ्याच दा कंबर दुखीचे सामान्य पासून तर खूप गंभीर समस्या असतात. वजन वाढल्यावर काहींना कंबर दुखीचा त्रास जाणवायला लागतो. काहीवेळा झोपताना भलत्याच आसनात झोपल्यामुळे सुद्धा सकाळी कंबर दुखायला लागते. कधी कधी खूप वजन उचलल्यामुळे सुद्धा कंबर दुखायला लागते. गरोदरपणात जस जसे गर्भाशय मोठे होत जाते तसा कंबरेवर ताण पडायला लागतो आणि कंबर दुखते. आणि डिलिव्हरीनंतर सुद्धा ह्या कंबर दुखीचा त्रास असतोच.

१) शरीरात कॅल्शियमची मात्रा पूर्ण करण्यासाठी डेअरी उत्पादने आणि कॅल्शियम युक्त आहार घ्या. त्यासाठी रोज २ ग्लास दूध प्या. त्यानंतर कमकुवत हाड ही सुद्धा कंबर दुखीची मोठी समस्या आहे. ह्यासाठी दररोज उन्हात २५ ते ३० मिनिटे बसावे.

२) ओवांना तव्यावर घेऊन त्यांना शेकून घ्या आणि थंड झाल्यावर त्याला चघळून चावून खा. आणि ही गोष्ट दररोज करत रहा. तुम्ही पाहणार की, तुमच्या कंबरेला खूपच आराम मिळवून जाईल.

३) ज्यावेळी कंबर दुखत असेल तेव्हा गरम पाण्याने किंवा गरम फडक्याने त्याला शेक करावा. ५ मिनिट गरम शेक देऊन त्यानंतर त्याला थंड पाण्याने शेक करावा. खूप लवकर आराम मिळेल आणि त्रासही कमी होईल.

४) जमल्यास तर सकाळी किंवा संध्याकाळी शरीराची हालचाल करावी. जर तुम्ही बसून काम करत असाल तर ही गोष्ट नेहमी न चुकता करावी.

५) ओवा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्यानंतर २०० ग्राम गूळ घेऊन त्यालाही पिसून घ्या आणि ह्या मिश्रणाला एकत्र करून एका डब्यात ठेऊन त्यातून एक चमचा रोज खा.

६) हळदीमध्ये अँटी- इंफ्लेमेटरी गुणांसाठी ओळखली जाते. हळदीमध्ये कर्कुमिन नावाचे तत्व असते ते सूज पासून वाचवून मांसपेशींना मजबूत करत असते. ह्यासाठी भाज्यांमध्ये हळद आणि सलाड वर हळद टाकत जा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
50%
Wow!
50%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon