Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

कामजीवनबाबत असणारे सामान्य गैरसमज

       कामजीवन, संभोग, सेक्स ही नावे जरी उच्चारली तरी आपल्या कडे अजुनही भुवया उंचावल्या जातात. या गोष्टींबाबत बोलणाऱ्या व्यक्तींना वेगळ्या नजरेने बघता येते. म्हणून या गोष्टीविषयी अनेक गैरसमज आहेत यातील काही सामान्य गैरसमजाबाबत माहिती घेणार आहोत.

१. संभोग म्हणजे काहीतरी वाईट

पाप-पुण्य या संकल्पना मानव निर्मित आहेत, निसर्गनिर्मित नाहीत. प्रत्येक प्राणी स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्यासाठी जन्मलेला असतो हा निसर्गनियम आहे. संभोगाची बळजबरी करणे, बलात्कार, सक्ती यांना पाप म्हणता येईल.

२. अश्लील चित्रफीत आणि सत्य

अश्लील चित्रफीत म्हणजेच पोर्नोग्राफी यात संभोगाच्या विविध प्रकार दाखवण्यात येत असतात. असे प्रकार प्रत्येक जोडप्याला जमतील असे नाही. त्यामुळे हे प्रकार जमले नाही तर चुकिचे असे काही नाही. कामजीवनविषयीचे योग्य ज्ञान यातून मिळत नाही. त्यात दाखवण्यात येणारे प्रकार जमतीलच असे नाही आणि जरी जमले तरी त्यातून कामतृप्ती लाभेलच असेही नाही. य चित्रफितीमध्येन पुरुष तासनतास संभोग करताना दाखवतात परंतु प्रत्यक्षात असे कोणताच पुरुष करू शकत या प्रकाराने फक्त काम भावनेला उत्तेजन मिळते.

३. हस्तमैथुन करणे म्हणजे विकृती

आपल्या समाजात लग्नानंतरच संभोग करता येतो. तोपर्यंत मनात आणि शरीरातही उसळणाऱ्या कामभावनासाठी हस्तमैथुनाच आधार असतो. त्यामुळे कामभावना दाबून ठेवणे किंवा त्यामुळे वाईट-वाईट विचार येणे यापेक्षा या उपायाने व्यक्त होणे केव्हाही चांगले. तसेच बऱ्याच कारणांमुळे पती-पत्नीत प्रत्यक्ष संभोग घडत नाही.अशावेळी जर जास्तच इच्छा प्रबळ झाली तर हस्तमैथुन योग्य पर्याय ठरू शकतो.

४. रोज संभोग केलाच पाहिजे.

आपण समजतो तशी संभोगाची क्रिया ऐच्छिक स्वरुपाची नसते. कामेच्छा झाली की संभोग हवा असतो. परंतु कामेच्छा स्वतःहून मुद्दाम निर्माण करता येत नाही. ती स्वयंचलित मज्जासंस्थेच्या अधीन असते. ठरवून संभोग करता येणे अशक्य असते

५. पिळदार शरीर असलेले पुरुषच स्त्रियांना आवडतात

हे एकदम चुकीचं आहे.  पुरुष पिळदार शरीराचा असेल तर उत्तम संभोग करू शकेल असा समज पुरुषाचा स्वतःचा असतो, स्त्रीचा नाही. पुरुषाचे हॅण्डसम दिसणे ताकदवान असणे,या बाबींचा आणि यशस्वी संभोगाचा काहीही संबंध येत नाही. पुरुष स्त्रीच्या भावना अपेक्षा समजून घेऊन त्याल प्रतिसाद देणारा, सुदृढ आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा असणे आवश्यक असते.

६.जास्तवेळ संभोग करणारेच पुरुष स्त्रीला आवडतो.

कधीच नाही. स्त्रीला प्रत्यक्ष संभोगात रस नसतो. परंतु तिला संभोगपूर्व काम क्रीडा, प्रणय यांत अधिक रुची असते. पुरुष किती वेळा लिंग ठेवू शकतो यापेक्षा तो किती विविधतेने प्रणयक्रीडा करतो याकडे तिचे जास्त लक्ष असते. पुरुषाने आपल्यावर खुपवेळ प्रेमाचा वर्षाव करावा, आपल्याला उत्तेजित करावे अशी तिची इच्छा असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon