Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

कमी उंचीच्या स्त्रियांना येणारी गर्भधारणेत गुंतागुंत


गर्भावस्थेवर स्त्रीच्या आहाराचा आणि ती काय करते याचा परिणाम होत असेल तर काही शारिरीक वैशिष्ट्यांचा जसे उंची, वजन याचाही गर्भावस्थेवर परिणाम होतो असे मानणे योग्य आहे, हे योग्य आहे का. मात्र वजनाच्या बाबतीत जसे बदल करू शकतो तसे व्यक्तीच्या उंचीसारख्या गोष्टींमध्ये बदल करणे शकत नाही. मग याचा परिणाम आपल्या बाळाच्या जन्मावर कसा होतो. ३ हजार महिलांच्या एका अभ्यासातून एक निरीक्षण नोंदवण्यात आले की बुटक्या स्त्रियांमध्ये प्रीमॅच्युअर प्रसुती किंवा वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता अधिक असते. मात्र ९ महिन्यांचा पूर्ण कालावधीच्या प्रसुतीवर फक्त उंचीचा परिणाम होतो असे नाही तर पोषण आणि जीवनशैलीशी निगडीत सवयींचाही त्यावर परिणाम होतो.

पहिल्यांदा बुटके म्हणजे काय हे समजून घेण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे महिलांमध्ये पाच फुटांपेक्षा कमी उंचीच्या स्त्रियांना बुटकी स्त्री असे मानले जातेपण याचा अर्थ या स्त्रियांची प्रसुती सर्वसाधारण किंवा नैसर्गिक प्रसुती होऊ शकत नाही असे नाही. फक्त या स्त्रियांमध्ये काही गुंतागुत होण्याची शक्यता असते. त्यापैकी काही शक्यता पाहूया.


१) मुदतपुर्व प्रसुती

जर बाळाचा जन्म ३७ आठवड्यांआधी बाळाचा जन्म झाला तर त्याला मुदतपुर्व प्रसुती असे संबोधले जाते आणि अशा प्रसुतीमध्ये श्वसन आणि पचन यांच्याशी निगडीत समस्या निर्माण होतात. आई आपल्या गर्भाशयात बाळ किती काळ सांभाळू शकते यावर शारिरीक उंचीचा परिणाम नक्कीच दिसून येतो.

२) कमी वजनाचे बाळ

बुटक्या स्त्रियांमध्ये गर्भाशय लहान असते त्यामुळे बाळाला वाढण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी अधिक जागा मिळत नाही. याचा अर्थ जन्माच्या वेळी बाळाचे वजन जितके असले पाहिजे त्यापेक्षा ते कमी भरतेच काही वेळा बाळाच्या उंचीवरही त्याचा परिणाम होतो.

३)  डोक्याचा आकार मोठा असणे किंवा सेफलोपेल्विक डिसप्रपोर्शन

बुटक्या स्त्रियांच्या गर्भाशयाचा आकार लहान असतो तसेच योनीमार्गही लहान असतो त्यामुळे प्रसुतीदरम्यान बाळाचे डोके जास्त मोठे असल्याने योनीमार्गातून पुढे सरकू शकत नाही. या स्थितीला सेफलोपेल्विक डिसप्रपोर्शन म्हणतात. थोडक्यात आईच्या ओटीपोटाचा आकार आणि बाळाचे डोके हे एकमेकांशी प्रमाणित नसते.

४) पेशींचे झीज किंवा नुकसान

योनीमार्गातून बाहेर येण्यासाठी बाळाचे वजन खूप जास्त असेल आणि जास्त वेळ प्रसुती कळा येत असतील तर योनी आणि गुदाशय यांच्या दरम्यानच्या पेशींचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो.

त्यामुळे आपण जरी बुटक्या स्त्रियांमध्ये मोडत असलो तरीही गर्भावस्थेविषयी फार चिंता करण्याची गरज नाही कारण उंची इतर अनेक घटकांपैकी एक परिणाम करणारा घटक आहे. योग्य पोषण, व्यायाम आणि काळजी घेतल्यास प्रसुती हळुवारपणे आणि आनंदाने पार पडेल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon