Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्याचे उपाय.

वाढत्या स्पर्धेमुळे कामाचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे कामाचा ताण देखील वाढला आहे हा तणाव कमी करण्यासाठी हे सोप्पे उपाय वापरल्यास ताण कमी होण्यास मदत होईल. 

१. मेडिटेशन एक औषध

 

विज्ञानातील अभ्यासाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जे व्यक्ती रोज ५ ते १० मिनिटे योगाभ्यास करतात आणि मेडिटेशनची प्रॅक्टिस करतात त्यांच्या मनावर कामाचा तणाव कंमी दिसून येतो. मेडिटेशनमुळे तुमचे मन शांत राहते आणि काय गरजेचे आहे आणि काय नाही यातील फरक आपण स्पष्टपणे समजून घेऊ शकतो. अशावेळी मन आणि डोके शांत असल्याने निर्णय घेण्यास उपयोग होतो आणि अर्थातच मनावर तणाव कमी राहतो.

२. झेपेल तेवढेच काम घ्या.

कामाच्या बाबतीत दिलेला शब्द पाळा. तुम्हाला झेपेल तेवढेच काम घ्या आणि तुम्ही करू शकाल एवढेच प्रॉमिस करा. अनेकदा आपण जास्तीचे काम घेतो आणि नंतर त्या कामाची शेवटची तारीख जवळ येते तसा मनावरील ताण वाढत जातो. घेतलेले काम नियोजन करून वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.कामाचे व्यवस्थित नियोजन झाल्यास ताण कमी होण्यास मदत होईल.

३. रीलक्स व्हा आणि फ्रेश रहा.

तुमच्या कामाच्या टेबलापाशी जास्त वेळ बसून राहणे आणि मधून मधून ब्रेक न घेणे तुमच्या कामाचा उत्साह कमीच करणार आहे. यापेक्षा ऑफिसच्या कामामधून मिळणाऱ्या या छोट्या ब्रेकचा पुरेपूर फायदा घ्या. यावेळात तुम्ही स्ट्रेचिंग, ब्रिस्क वाॅक किंवा इतरांसोबत गप्पागोष्टी करू शकता. याने मन फ्रेश राहते. कामाचा तणाव अगदीच वाढत नाही.

स्मोकिंग आणि कॉफी पिणे अशा गोष्टी या ब्रेकमध्ये सहसा ऑफिसचे लोक करतात परंतु तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी या गोष्टी अजिबात योग्य नाहीत. तुमच्यासाठी काय योग्य आहे ते ओळखा आणि तणाव दूर करण्यावर लक्ष द्या.

४. नियोजन करा.

वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यात ज्या व्यक्ती यशस्वी आहेत त्या सर्वांची त्यांच्या वेळेच्या नियोजनावर पकड आहे. महत्वाचे म्हणजे जेंव्हा तुम्ही कामाच्या वेळेचे नियोजन करता तेंव्हा गोष्टी सोप्या होतात कारण तुम्ही स्वतःसाठी एक डेडलाईन आखून घेत आहात. त्यानुसार काम करणे सोपे जाते. न ठरवता जमेल तसे करायचे म्हटल्यास ते योग्यरित्या सफल होत नाही आणि कामाचा ताण अजूनच वाढतो.

तुमच्या ऑफिसच्या कामासाठी आणि वैयक्तिक कामांसाठी एक टाइमलाईन आखून घ्या. ज्यात तुमचे वैयक्तिक आणि खाजगी आयुष्य दोन्हीसाठी वेळ असेल. तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणे किंवा तुमचा आवडता छंद जोपासणे याने तुमची क्रयशक्ती वाढते. वेळेचे नियोजन तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी संधी देईल.

५. आरोग्यासाठी योग्य नसणारी माणसे आणि अन्न दोन्हीपासून दूर राहा.

तुम्ही ज्या प्रकारचे अन्न घेता किंवा ज्या प्रकारच्या लोकांच्या सानिध्यात राहता त्यावर तुमचा मूड आणि दिवसभराचा उत्साह बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो. जिथपर्यंत तुमच्या डाएटचा प्रश्न आहे, तर तुम्ही कॉर्टीसोल आणि अंड्रेनाइल वाढवणारे किंवा ग्लाय्केमिक इंडेक्स जास्त असणारे अन्नपदार्थ खाणे टाळा. यामुळे स्ट्रेस अजून वाढेल आणि सुस्ती येईल.

याजागी तुम्ही प्रोटीन्स आणि पोषकद्रव्ये असणारे अन्नपदार्थ निवडू शकता. जसे की, बदाम,बिया, होल ग्रेन बिस्कीट, फळे, हिरव्या भाज्यांचे सलाड इ. यामुळे मूड ताजा करणारे इंडोर्फिन तुमच्या मेंदूतून सोडले जातात आणि तुमचा उत्साह कायम राहतो. माणसांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर, ऑफिसमधून घरी जातांना चिडलेल्या मूडमध्ये कधीच जाऊ नका. तुमचा संपूर्ण दिवस यामुळे खराब होऊ शकतो.

शक्यतो चुगल्या करणारे, चिडचिड करणारे, आणि सतत तक्रार करण्याचा स्वभाव असणाऱ्या सहकार्यांपासून दूर राहा. अशा लोकांच्या सानिध्यामुळे आपल्याही मूडवर परिणाम होऊ शकतो.

६. स्वतःवर आणि इतरांवर सुद्धा प्रेम करायला शिका.

जर कधी तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा इतर सहकाऱ्यांकडून टीका झाली किंवा तुम्हाला नकारात्मक फीडबॅक मिळाला तर अशावेळी चिडून किंवा नाराज होऊन न जाता संयम आणि धीराची भूमिका घ्या. तुम्हाला इतरांविषयी आणि स्वतःविषयी शांतपणे विचार करण्याची गरज आहे. वैयक्तिकरित्या मनाला लाऊन न घेता इतरांकडून होणाऱ्या टीका आणि कौतुक दोन्ही स्वीकारा.

तुमच्यावर होणाऱ्या टीका समजून घेऊन तुमचे काम सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर चिडून जाऊन परिस्थिती हाताळू नका. ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे त्यांच्या जागी राहून विचार करून पहा. यातून तुम्हाला एक वेगळा दृष्टीकोन मिळेल. तुम्ही गोष्टी मनाला न लाऊन घेता त्यांच्या प्रॅक्टिकली विचार करायला शिकाल.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon