Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

सैंधव मिठाचे (काळ्या मिठाचे) फायदे

 मिठा शिवाय जेवणाला काही अर्थ नसतो. परंतु पांढऱ्या मिठाच्या अति सेवनाने अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे काळ्या मीठाचे सेवन उपयुक्त ठरते. सोडियम, क्लोराइड, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे डायजेशन, ब्लड प्रेशर आणि एनीमिया दूर करण्यात मदत. आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.

सामान्य मीठ हे समुद्रापासून मिळते आणि शेंदेलोण (सैंधव) व पादेलोण (काळं मीठ) ही खनिज मिठं आहेत. मिठाचे खडक फोडून, चूर्ण करून ती बनवलेली असतात. त्यामध्ये सोडिअम क्लोराईडशिवाय अत्यंत अल्प प्रमाणात मॅग्नेशिअम व कॅल्शिअम यांची संयुगं असतात.

फायदे

१. सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

२. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

३. पित्त झाल्यावर आलं लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्त मुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते

४. अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो.

५. सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.

६. अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.

७. कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

८. आयरनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास उपयुक्त असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon