Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

ह्या दिवसात ह्या फळाचा आस्वाद नक्कीच घ्या


बऱ्याच स्त्रियांना हे फळ खूप आवडते ते म्हणजे कालीगंड. नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. आणि उन्हाळ्यात जसा हापूस आंबा खाण्याचा आनंद वेगळाच असतो तसाच टरबूज खाण्याचा आनंदही काहीतरी असतोच. लाल - लाल रसाळ गोड असे टरबूज. 

* कलिंगडामधून विटामिनस ए, बी६ आणि विटामिनस सी खूप मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्याचं प्रमाणे अँटिऑक्सिडेंट्स आणि अमिनो असिडसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळते.

* कलिंगडाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळे स्वस्थ ठेवण्यात मदत होते. याच्या सेवनाने रातांधळेपणा आणि मोतीबिंदू यासारख्या डोळ्यांच्या आजारापासून दूर राहिले जाऊ शकते.

* शरीरातील कामोत्तेजक वाढण्यास कलिंगड मदत होते.

* जर तुम्हाला डोळ्यांच्या तक्रारी असतील तर तुम्ही कलिंगडाचे सेवन करणे फायदेशीर राहील

* कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते. कलिंगड हे एक अँटिऑक्सिडेंटसुद्धा आहे.

* सी व्हिटॅमिनचे पर्याप्त सेवन कोलेजनचे निर्माण करण्यासाठी आवश्यक असते. हे त्वचा आणि केसांसाठी संरचना तयार करते. कलिंगड शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते,जे त्वचा आणि केस स्वस्थ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. यामुळे याच्या सेवनाने शरीर नेहमी सशक्त राहते. त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात.

 * कलिंगड वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम फळ आहे. यामध्ये असलेले सिट्रयूलाइन नावाचे तत्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्व वसा तयार करणाऱ्या पेशींना कमी करते. कलिंगडामध्ये असेलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंग दरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. या व्यतिरिक्त कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्स असतात.

 * कलिंगडमध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी कलिंगड उपयोगी फळ आहे.

* कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे आपण ताप व संक्रमण (इन्फेक्शन)पासून दूर राहू शकतो.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon