Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

काळे मनुके खा आणि आरोग्यविषयक हे फायदे मिळवा.

द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सुकवली जातात तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. आयुर्वेदात मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. काळी व हिरवी अशा दोन प्रकारची द्राक्षे असतात. यापैकी काळ्या द्राक्षांमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. या काळ्या मनुकांचे आरोग्यविषयक फायदे आपण पाहणार आहोत.

१. काळे मनुका रात्री पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात कुस्करून त्यामध्ये जिरेपूड टाकावी व हे मिश्रण मनुक्यासह हळूहळू प्यावे. यातील तंतूमय घटकांमुळे पोट साफ मदत होते. तसेच यामुळे मलावरोध, बद्धकोष्ठता हे विकार दूर होतात.

२. मनुकांच्या सेवनाने शरीरामध्ये होणाऱ्या चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे ग्लुकोजची गरज मिळते.

३. शरीराचा आग, दाह होत असल्यासकाळे मनुके व ज्येष्ठमध रात्री भिजत घालावे. सकाळी उकळून ते पाणी प्यावे. शरीराची दाह कमी होते. तसेच मनुका आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने शरीरात होणारा दाह कमी होतो.

४.अर्धशिशीचा त्रास होत आल्यास काळे मनुके व धणे रात्री थंड पाण्यात भिजत घालून सकाळी हे पाणी प्यायल्याने अर्धशिशीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

५.आम्लपित्त, अपचन, ढेकर येणे अश्या समस्यांमध्ये मनुकांचे सेवन उपयुक्त ठरते.

काळ्या मनुकांच्या सेवनाने मूतखडा, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना व जळजळ यावर गुणकारी ठरतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon