Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

ओठ काळे असतील तर मोहरीचा असा वापर करा


मोहरीचा उपयोग तुम्ही स्वयंपाकात करत असतात आणि मोहरीशिवाय कोणतीच भाजीला चव येत नाही. काही आई ह्या भाज्यांत खूप मोहरी वापरीत असतात आणि त्यांचा हाताचा स्वयंपाक हा स्वादिष्ट व रुचकर होत असतो. मोहरी ही ब्रासिका नावाच्या फॅमिलीशी संबंधित आहे. दाल तडका, पोहे, कडी ह्यामध्ये मोहरी वापरलीच जाते. मोहरीमध्ये असे काही आयुर्वेदिक गुण आहेत की, जे तुम्हाला आरोग्याला व काही वैयक्तिक समस्यांवर उपयोगी पडेल. ते कशाप्रकारे ते आपण बघू.

१) बऱ्याच स्त्रियांचे ओठ काळे पडून जातात आता त्याचे कारण निश्चित सांगता येत नाही की, नेमके कोणत्या कारणांनी ओठ काळे पडत असतात. पण त्या काळ्या ओठांवर, जर तुम्ही मोहरीला वाटून त्याचा उरलेला रस ओठांना लावला तर हळूहळू ओठांचे काळसर असणे दूर होऊन जाते.

२) सांधेदुखी आता तर तुम्हाला नसेलच आणि जर असेल किंवा तुमच्या घरात कुणाला असेल आईला किंवा सासूला कुणालाही तर मोहरी वाटून ती कापुरात मिसळावी आणि त्या द्रवाने मसाज करावा. आणि हा मसाज दररोज करावा ह्यामुळे गुडघेदुखी सांधेदुखी कायमची बरी होईल.

३) मोहरीचा उपयोग त्वचेसाठी व केसांसाठीही होत असतो. त्यासाठी मोहरीचे तेल आठवड्यातून ३ वेळा डोक्याला चोळावे ह्याने तुम्हाला दोन प्रकारचे फायदे होतात, केसांना आणि मुरुम व पुटकुळ्या असतील तर त्या बऱ्या होतात.

४) जर तुम्हाला कानदुखी असेल तर ऑलिव्ह तेलामध्ये मोहरीचे तेल मिसळून त्याचे ३ ते ४ थेंब कानात टाकावेत. कान दुखणे कमी होऊन बंद होईल.

५) सध्या संशोधन चालूय आणि सांगितले जाते की, कॅन्सर वर मोहरीने उपचार करता येणार आहे. आणि मोहरीचा जेवणात समावेश असल्याने तुम्हाला त्याचा फायदा कॅन्सर न होण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. कुष्ठरोगावरही मोहरीचा मात्रा चालत असतो.

तेव्हा मोहरी खात असाल तर चांगलेच आहे. आणि खात नसाल तर आता जेवणात त्याचा वापर करावा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon