Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

अशी करा झटपट कैरीची डाळ

हळू-हळू कैऱ्या बाजारात दिसू लागल्या आहेत. त्यामुळे आता कैरीच्या विविध पदार्थाचे वेध सगळ्यांना लागले असतील अश्याच आपण एका पदार्थाची रेसिपी आपण पाहणार आहोत. ते म्हणजे कैरीची किंवा आंब्याची डाळ . खरं तर  चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा आहे. 

साहित्य 

१. एक कैरी कोणतीही  असल्यास चालेल. पण तोतापुरी असल्यास उत्तम 

२. १ वाटी हरबरा डाळ २-३ हिरव्या मिरच्या

३. २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात) 

४. १ टीस्पून साखर 

५. १/२ इंच आल्याचा तुकडा 

६. फोडणीचे साहित्य - तेल, हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती 

१. हरबरा डाळ सध्या पाण्यात कमीतकमी २ ते ३ तास भिजत घालावी. 

२. कैरीची साल काढुन त्याचे तुकडे करावेत किंवा सरळ कैरी खिसुन घ्यावी. 

३. हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत, आल्याची साल काढुन त्याचे पण तुकडे करावेत.

४.  कैरी, डाळ, मीठ, आले, मिरची एकत्र करुन मिक्सरमधे जाडसर वाटुन घ्यावे. 

५. कैरी खिसली असेल तर मिक्सरमधे बारीक न करता तशीच डाळीमधे मिसळली तरी चालते. साखर घालुन सगळे एकत्र नीट मिसळुन घ्यावे.

६. तेलाची हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता घालुन खमंग फोडणी करुन डाळीवर घालुन अजुन एकदा नीट मिसळुन घ्यावे. आवडत असल्या वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon