Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

काही महत्वाच्या गोष्टी पापडाविषयी. . .


पापड हा महाराष्टरातील जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक राज्यात पापड बनविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. राजस्थानमध्ये बेसनाचे, पंजाबमध्ये उडदाच्या डाळीचे पापड बनविले जातात. पापड भाजून त्यावर टोमॅटो, कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड आवडीने खाल्ला जातो. मात्र तो पचायला तीन ते पाच दिवस लागतात हे अनेकांना माहित नाही. पापड वजनाला हलके असतात, मात्र पचायला तेव्हढेच अवघड असतात. दोन पापडात एका चपातीएवढी कॅलरी असते.

मुळात पापडात टाकला जाणारा पापडखार हा पापडाला जड करतो. ह्रदय, किडनी किंवा ब्लडप्रेशरची समस्या ज्यांना आहे त्यांनी पापड खाणे टाळावे. ज्यांना जास्त अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही पापडापासून दूरच राहायला हवे.

१) तळलेला खा किंवा भाजलेला

पापड तळल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात तेल जमते. तो भाजला तर त्यावर आर्किलेमाइड तयार होते, जे एक न्यूरोटाॅक्सिन आहे आणि त्याला कार्सिनोजेनही म्हणतात. त्यावर सोडियम बेंझाइटचा प्रयोग यासाठी करतात की पापड जास्त दिवस चांगला राहावा. यामुळे कॅन्सर होण्याचा धोकामात्र वाढतो.

२) धोकादायक

खाल्ल्यानंतर पापड पोटातच राहतो. त्याला पचायला तीन ते पाच दिवस लागतात. बाकीच्या अन्नाचे चार तासांत पचन होते, मात्र पापड तसाच राहिल्याने आतड्यांना आराम मिळत नाही.

३) कशावरून

पापड हा रिफाइंड घटकांपासून तयार होतो. बारीक बेसन, मीठ त्यात जास्त असते. त्यात फायबर नसल्याने पचन करताना आतड्यांवर ताण येतौ. पाचन रसाबरोबर मिसळल्यावर पापडाची पेस्ट तयार होते आणि आतड्यांना चिकटते. त्याने आतड्यांची क्षमता घटते.

४) काय होऊ शकते ?

पापड खूप वेळ आतड्यांमध्येच राहतो. तो आतड्यांमध्ये सडल्याने अनावश्यक बॅक्टेरिया तयार होतात.

आतड्यांच्या आत तो नुकसान करतो. आतड्यांचा आजार किंवा अॅसिड रिप्लेक्स आदि तक्रारी सुरू होऊ शकतात. यामुळे आतड्यांची पाचनक्षमता कमी होण्याची शक्यताही गूनिर्माण होत

पापडांमुळे आतड्यांतील व्हिटॅमिन आणि मिनरल्स कमी होऊ शकतात. पापडामुळे आतड्यांमध्ये असलेले इतर खाद्यपदार्थ पचनास अडथळा निर्माण होतो. त्याने पोटाचे विकार वाढू शकतात.

ह्यात दिलेली माहिती ही चुकीच्या पद्धतीने पापड बनविणे ह्यावर आधारित आहे. तसे आपण घरच्या घरी पापड बनवितो म्हणून काहीच समस्या नाही. 

स्रोत - मंजरी चंद्रा, न्युट्रीशनिस्ट, मॅक्स हाॅस्पिटल, न्यू दिल्ली

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon