Link copied!
Sign in / Sign up
91
Shares

काही आश्चर्यकारक पद्धती ज्यांनी तुम्ही गरोदर होऊ शकता.

प्रेग्नेन्सी कीट वरच्या दोन गुलाबी रेषा एखाद्या स्त्रिचा दिवस बिघडवू शकतात किंवा बनवू शकतात. काही स्त्रियांसाठी गरोदर होणे सोपे असते म्हणजे ‘केले आणि दिवस गेले” ! आता तुमच्या आत एक दुसरा जीव तयार होतोय.! तर काही स्त्रियांसाठी हे अवघड ठरू शकते कारण यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा धीर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अवघड वाटतात. 

एका बाजूला अशाही काही स्त्रिया आहेत ज्यांना गरोदर झाल्यावर आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. त्यांना कल्पनाच नसतेच की त्या गरोदर होऊ शकतात. योग्य वेळ आणि शरीराची गरोदर होण्यासाठी लागणारी अनुकूल स्थितीमुळे देखील तुम्हाला दिवस जाऊ शकतात. हो! तुम्ही सर्व काळजी घेऊन गर्भनिरोधक वापरले असतील तरीही तुम्ही गरोदर होऊ शकता आणि अशावेळी एक आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसेल.

तुम्हाला माहितीये का की तुम्ही केवळ टॉयलेट सीटवर बसलात तरीही प्रेग्नंट होऊ शकता ! टॉयलेट सीटवर असणारा शुक्राणू १ तासापर्यंत जिवंत असतो आणि जर एखादा शुक्राणू तिथे असेल आणि तुम्ही त्यावर बसलात तर कदाचित तुम्ही गरोदर राहू शकता !

इथे दिलेल्या काही आश्चर्यकारक पद्धतीने स्त्रिया गरोदर राहू शकतात.

१. नाक टोचणे.

 शरीराची प्रजोत्पादन क्षमता वाढवण्यासाठी डाव्या बाजून नाक टोचतात. होय! नाक टोचल्याने तुमची प्रजनन शक्ती वाढते. भारतीय संस्कृतीत हे सांगितले आहे. आपल्याकडील अनेक स्त्रियांची नाकाची डावी बाजू टोचलेली असते. हे तुम्हाला शृंगारासाठी, नथ घालण्यासाठी वाटत असले तरी यामागे अॅक्युप्रेशर ची किमया आहे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि त्यासोबत बिजफलनाच्या शक्यता देखील वाढतात.

आता तुम्हाला कळले असेल कि लग्नात मुलीला नथ का घालायला सांगितले जाते.

२. महिन्याच्या त्या दिवसात

तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की शुक्राणू स्त्रीच्या शरीरात अनेक दिवसांपर्यंत राहू शकतो आणि एका स्त्रीची अंडमोचन प्रक्रिया म्हणजेच ओव्ह्युलेशन १४ दिवस चालू असते. शक्यता खूप कमी असते पण काही स्त्रिया अशाने देखील गरोदर राहिल्या आहेत.

असे असले तरी तुमच्या मासिक चक्रावर हे सर्व अवलंबून असते.

३. सूर्यप्रकाश.

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणे कोणाला नाही आवडत पण ह्याच उन्हामुळे तुम्हाला बाळ होण्याची शक्यता वाढू शकते. सूर्यप्रकाशामुळे शरीराला ‘ड’ हे जीवनसत्व मिळते जे तुमच्या गरोदर राहण्याच्या संधी वाढवू शकते. शास्त्रज्ञांच्या मतानुसार सूर्यप्रकाश स्त्रियांच्या शरीरातील सेक्स हार्मोन म्हणजे प्रोजेस्टेरोन आणि इस्ट्रोजेन वाढवण्यास मदत करते.

लगेच तुमची समुद्राकाठी एखादी सहल बुक करा.!

४. वेळेआधी काढून घेणे. ( Coitus interruptus)

ही गर्भावस्था टाळण्यासाठी वापरली जाणारी जुनी पद्धत आहे. आपण एका लोकसंख्या जास्त असलेल्या देशातले सुशिक्षित नागरिक आहोत, आपल्याला या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. पुरुषाने वीर्य बाहेर येण्यापूर्वी लिंग स्त्रीच्या योनीतून बाहेर काढून घेणे जेणेकरून शुक्राणू स्त्रीच्या गर्भात समावेश करणार नाहीत, अशी ही पद्धत आहे.

पण तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर विर्याचा एखादा छोटासा थेंब देखील तुम्हाला गरोदर करू शकतो. लिंग संभोगाआधी पुसले तरीही गरोदर होण्याची ५०% शक्यता असते. यातला एखादा छोटासा अतिउत्साही शुक्राणू तुमच्या गर्भात शिरू शकतो.

५. फाटलेला कोंडोम.

हो. कधी कधी कंडोम पण तुम्हाला धोका देऊ शकतात. कंडोम घालण्याच्या विशिष्ट पद्धत्ती आहेत. जर त्याच्या समोरच्या बाजूस थोडीशी जागा ठेवण्यास तुम्ही विसरलात तर एक अपघात होऊन तुम्हाला थोड्या दिवसांनी गरोदर असल्याचे सरप्राईज मिळू शकते.

यासोबतच कंडोम पाकिटातून काढतांना तुमच्या दातांचा वापर करू नका, कारण तसे करतांना जर चुकून त्याला एखादे चिद्र पडले तर शुक्राणून्ना बाहेर पडून तुमच्या स्त्रीबिजात शिरण्याची एक चांगली संधी त्यातून मिळेल.

६. पिंपळाचे झाड.

तुम्ही पुराणात स्त्रियांनी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाची केलेली पूजा ऐकली असेल. आपल्याकडे यासाठी वटसावित्री पोर्णिमा देखील असते. या झाडांमध्ये उपचार शक्ती असतात. या झाडांची हिरवी हिरवी डुलणारी पाने तुमच्या शरीराच्या अवस्था गरोदर राहण्यासाठी योग्य बनवू शकतात. तुम्ही गरोदर राहण्यासाठी एखादे औषध घेतलेत तरीही त्यापेक्षा जास्त परिणामकारक ही झाडे आहेत !

७. न धुतलेले हात.

तुमच्या जोडीदाराने त्याचे काम झाल्यानंतर हात न धुता जर एखाद्यावेळी तुमच्या योनीमार्गाजवळ हात लावला तर कदाचित तुम्ही संकटात सापडू शकता. हातावर वीर्याचे काही भाग राहू शकतात. त्यामुळे स्वच्छ राहा, हात वेळेवर धुवा आणि या गोष्टींची खबरदारी घ्या म्हणजे तुम्हाला आयुष्यात अचानक सरप्राईज नाही मिळणार.!

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon