Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

काही बाळं पायाळू का असतात ?


सामन्यात बहुतांश बाळचा जन्म हा त्याच्या डोक्याच्या दिशेने होतो. आणि ज्या बाळांचा जन्म पायाच्या बाजूने होतो,किंवा ज्यावेळी बाळ गर्भाशयात असते आणि जन्माच्या वेळी बाळाचे पाय हे योनीच्या मुखाजवळ असतात. अश्या बाळांना पायाळू म्हणतात. 

गर्भाशयात असताना बाळ आठव्या महिन्या पर्यंत अनेक वेळा फिरू शकते किंवा फिरते. बाळाच्या आकारमानाच्या प्रमाणात त्याच्या आजूबाजूला असलेले गर्भजल जास्त असल्यामुळे त्याला हालचाल करायला वाव असतो. सर्वसाधारणपणे 32 व्या आठवड्याच्या सुमारास बाळाचे डोके जड असल्याने खाली येते व त्यानंतर फिरायला फारशी जागा नसल्याने प्रसूतीपर्यंत त्याच स्थितीत राहते. बऱ्याचदा बाळा गर्भाशयात 32 आठवड्यांपर्यंत पाय खाली या स्थितीत असतात. अश्या बाळांपैकी फार कमी बाळे  पायाळू जन्माला येतात..

पायाळू बाळ जन्माला येण्याची कारणे 
 १. जास्त प्रमाणात गर्भजल असणे.

गर्भजलाचे प्रमाण जास्त असल्यास बाळाला फिरायला भरपूर जागा असते व त्यामुळे बाळ पायाळू असू शकते.

२. जुळी किंवा त्यापेक्षा जास्त मुले असले तर 

बहुतांश जुळ्या मुलांमधील एक बाळ पायाळू असू शकते. 

 ३. गर्भाशयाच्या रचनेतील दोष 

काहीवेळा गर्भाशयाच्या आकारात दोष असतो किंवा मध्ये जाड पडदा असतो. तर गर्भाशयाच्या काही रोगांमध्ये गाठी असतात. अशा वेळी गर्भाशयाच्या आतील पोकळी नियमित नसते व बाळाची स्थिती पायाळू असू शकते. कारण मोठे डोके खाली यायला जागा नसते.

४.  गर्भाशयाचे जास्त प्रमाणातील प्रसारण 

अनेक वेळा बाळंतपण झाले असल्यास स्त्रीचे गर्भाशय खूप जास्त प्रसरण पावलेले असते व साहजिकच बाळाच्या आजूबाजूला जास्त जागा उपलब्ध असते.

५.  वार खाली असल्यास

बाळाची नाळ छोटी असल्यास,बाळाच्या स्नायूंमध्ये दोष असल्यास बाळ पायाळू असू शकते. गर्भारपणात नियमीत तपासणी दरम्यान डॉक्टरयाबाबत माहिती देतात. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon