Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

काखेतील खाजेवर घरगुती उपाय


 

उन्हाळ्यात घाम येणे हे तर टाळता येत नाही म्हणून आपण डिओडरंटचा वापर करतो. त्यातही काखेत घाम येत असेल तर त्याशिवाय पर्यायच नसतो. उन्हाळ्यात काखेत खूप घामही येतो आणि खाजही येते. काही वेळा दिवसभर काखेचा भाग ओला राहिल्याने काही वेळा जंतुसंसर्गही होऊ शकतो. काखेतील त्वचा अत्यंत संवेदनशील असल्याने खाज येते काही वेळा काखेतील त्वचेवर लालसर पुरळही येते.

उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या सर्वसाधारणपणे दिसून येते. वैयक्तिक स्वच्छता नीट न राखल्यास ही समस्या जाणवते. आणि त्यामुळे बुरशी किंवा जीवाणू संसर्ग होऊ शकतो.यावर काही घरगुती उपायही करणे शक्य आहे. त्यामुळे काखेतील त्वचा चांगली आणि मऊ राहू शकते.

कोरफड आणि खोबरेल तेल-

कोरफड ही त्वचेवर अत्यंत उत्तम ठरते. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो शिवाय खाजही बरी होते. कोरफडीच्या औषधी गुणांमुळे काखेतील त्वचा बरी होते आणि अति घाम येण्याचे प्रमाण कमी होते. नारळ तेल त्वचा मऊसुत बनवते. त्यामुळे कोरफड आणि नारळ तेल यांचे मिश्रण लावल्यास काखेतील त्वचा अतिशय मऊ होते. किंवा कोरफडीचा गर काढून काखेत लावावा. २० ते ३० मिनिटे ठेवावा. थंड पाण्याने ही जागा धुवावी. असे सतत तीन चार दिवस केल्यास फायदा नक्कीच होतो.

बर्फाचा शेक

बर्फाचा शेक घेतल्याने त्वचा नितळ होते आणि त्वचेला आराम मिळतो. त्यामुळे काखेत खूप खाज येत असेल तर बर्फाचा शेक घेणेही उत्तम उपाय आहे.

टी ट्री तेल

काखेत घाम येऊन पुरळ आणि खाज येत असेल तर टी ट्री तेल खूप फायदेशीर ठरते. त्यात अ‍ॅटीसेप्टीक गुण असतात. त्यामुळे पुरळ आणि खाज दूर होण्यास मदत होते. एक चमचा ऑलिव्ह तेल घेऊन त्यात ५-६ थेंब टी ट्री तेलाचे मिसळावे. त्यानंतर काखेचा भाग कोरडा करून त्यावर हे मिश्रण लावावे. १० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. अशा प्रकारे २-३ वेळा करावे.

ओटमील -

काखेतील खाजेवर ओटमील प्रभावी ठरते. त्यामुळे त्वचेची पी. एच पातळी संतुलित राहाते आणि त्वचेला मऊपणा येतो. त्यासाठी एक कप ओटमील टबात गरम पाण्यात मिसळावे. त्यात लव्हेंडर इसेन्शिअल तेलाचे काही थेंब मिसळावेत. १५ ते २० मिनिटे पाणी तसेच ठेवावे. मग ते पाणी काखेत लावावे.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर-

यामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे काखेत घामामुळे संसर्ग होऊन खाज येत असेल तर ती बरी होण्यास मदत होते. व्हिनेगरमधील अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड संसर्गावर परिणाम कारक ठरते. एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्यावे आणि अध्र्या कप पाण्यात मिसळावे. त्यानंतर कापसाने हे मिश्रण काखेत लावावे. १० मिनिटे तसेच राहू द्या आणि मग धुवून टाका. दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय करावा.

दही

दह्यामुळे त्वचेत वाढलेले आम्लाची पातळी कमी होते. तसेच दह्यातील चांगले जीवाणू बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यास उपयोगी ठरतात. त्यासाठी आहारात दही सेवन करावे. काखेत कापसाने दही लावावे. एक तास तसेच राहू द्यावे. मग पाण्याने त्वचा धुवून काढावी आणि कोरडी करावी. दिवसातून तीन वेळा हा उपाय करावा.

कडुनिंब

कडुनिंब त्याच्या औषधी गुणांसाठी ओळखला जातो. त्यात जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे वेदना, खाज कमी होण्यास मदत होते. कडुनिंबाची पाने पाण्यात १५ मिनिटे उकळावीत. त्यानंतर पाणी गाळून गार करावे. या पाण्याने काखेची त्वचा धुवावी. मग साध्या गार पाण्याने ती त्वचा धुवून स्वच्छ करावी.

बेकिंग सोडा

त्वचेच्या समस्यांसाठी हा अत्यंत उत्तम पर्याय मानला जातो. त्याच्या अल्कलाईन गुणधर्मामुळे त्वचेचे पीएच संतुलन होते. हा वापरण्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळावा. हे मिश्रण काखेत लावावे. तीन मिनिटांनी धुवून टाकावे. मग त्वचा पुसून घ्यावी. हा उपाय रोज करावा.

लिंबू 

लिंबातही जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचाही वापर करू शकतो. qलबाची एक फोड कापावी आणि थेट काखेतील त्वचेवर लावावी. त्या जागेला मसाज करावा. मग ते वाळू द्यावे. दोन मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवून टाकावे. दिवसातून एकदा तरी हा उपाय करावा.

शिआ बटर 

शिआ बटर मुळे पुरळ आलेली त्वचा मऊ होते. तसेच खाज आणि संसर्गही कमी होतो. त्यात संसर्गविरोधी आणि जीवाणूविरोधी घटक असतात. काखेतील भागावर शिआ बटर लावावे. काही मिनिटे तसेच ठेवावे मग गार पाण्याने धुवून घ्यावे. दिवसातून काही वेळा हा उपाय करावा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon