Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

उन्हाळ्यातील काखेतील दुर्गंधीवर हे घरगुती उपाय करा

वाढत्या उन्हा बरोबर घाम आणि काखेतील दुर्गंधी देखील वाढत असते. आणि कामाच्या ठिकाणी एसी असला तरी बाहेरून आल्यावर घाम येतोच आणि फिरतीचे काम असल्यास हा त्रास नक्कीच जाणवतो. यासाठी अनेक परफ्युम डिओ सारखे उपाय उपलब्ध आहेत पण हे उपाय तात्पुरते असतात परंतु यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

१.  काखेतील दुर्गंधीचा संबंध शाररिक स्वच्छतेबरोबर तुमच्या आहार-विहारशी तुमच्या खाण्याच्या सवयींवर देखील अवलंबुन असतो.

२. या दिवसात तुम्ही भरपूर कांदा लसूण खात असाल तर ते कमी करा. 

३.  कॉफी पिण्याची सवयीने घामाला एक विशिष्ट प्रकारच दुर्गंध येतो. त्यामुळे कॉफी पिणे कमी करावे.

४. तिखट खाणे कमी करा.

५. आहारात गुणाने थंड असणारे काकडी, कलिंगड अश्या पदार्थांचा समावेश करा 

६. शक्य तितके जास्त सुती कपडे वापरा. सुती कपडे घाम कमी आणतात आणि आलेला घाम शोषून घेतात.

७. अंघोळ करताना काखेची स्वच्छता करा 

८. शक्य असल्यास दिवसातून दोनदा अंघोळ करा. किंवा काखची जागा स्वच्छ करा. 

८. तुमच्या काखेत केस वाढले असल्यास त्यात घाम जमा होऊन जीवाणूंची निर्मिती होते. त्यावेळी वेळोवेळी काख साफ करणे आवश्यक असते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon